आ.रोहित पवारांना आलेल्या नोटीसवर बोलण्यास शरद पवारांचा नकार ; रोहित पवारांचा न्यायालयाचा दिलासा

Sep 29, 2023 - 21:23
 0  529
आ.रोहित पवारांना आलेल्या नोटीसवर बोलण्यास शरद पवारांचा नकार ; रोहित पवारांचा न्यायालयाचा दिलासा

आय मिरर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मध्यरात्री महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देत बारामती ॲग्रोचे दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या.यावरून आमदार रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.मात्र, या विषयी बोलण्यास शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात नकार दिलाय. शरद पवार यांची आज बारामतीत पत्रकार परिषद पार पडलीय.यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी स्पष्ट पणे बोलण्यास नकार दिलाय. बारामतीतील बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई केली होती. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना रात्री 2 वाजता नोटीस देण्यात आली होती.

तर 72 तासांत प्लांट बंद करण्याची सूचना नोटीसीतून देण्यात आल्या होत्या मात्र आता रोहित पवारांनी या कारवाई विरोधात न्यायालयात धाव घेतल्यानंतर आमदार रोहित पवारांना दिलासा मिळाला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow