इंदापूरात 60 दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव रोपण,मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा उपक्रम..!
आय मिरर(देवा राखुंडे)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने 60 दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव रोपण शिबीर इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पार पडले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबीराचे उद्घाटन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे उपस्थित होते.
यावेळी बोलताना वैद्यकीय कक्षाच्या पुणे जिल्हा समन्वयिका सीमा कल्याणकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या दिव्यांग बांधवांना हात नाही किंवा पाय नाहीत अशा दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम हात व पाय रोपण मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कक्षाचे मंगेश चिवटे यांच्या सहकार्यातून जिल्ह्यातील 60 दिव्यांगांना कृत्रिम अवयव रोपण करण्यात आले आहे.
दरम्यान शिवजयंती उत्सवानिमित्त वैद्यकीय मदत कक्ष पुणे ग्रामीणच्या वतीने इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथील निलोफर पठाण यांना शिवकन्या पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सीमाताई कल्याणकर तसेच पुणे जिल्हा ग्रामीण कक्ष प्रमुख भूषण सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर व बारामती तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
यावेळी वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून सद्यस्थितीची, सुखसुविधाबाबत माहिती घेतली.लवकरच दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात, पाय तसेच कुबडी देण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय कक्षाचे सागर आवटे, ॲड.आनंद केकाण, सोमनाथ लांडगे, राधिका जगताप, रुपाली रासकर, निर्मला जाधव, सतीश गावडे, मंगेश खताळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
What's Your Reaction?