Good News इंदापूरच्या चेतना कॉलेजला डी. फार्मसीची मान्यता
आय मिरर
सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसीला डी. फार्मसीची मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे यांनी दिली.
या महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये डी-फार्मसी या अभ्यासक्रमासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पी.सी.आय) प्राधिकरणाकडून डी-फार्मसीच्या या शाखेसाठी ६० जागांची मान्यता मिळाली आहे. पी.सी.आय.बरोबरच महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ (एमएसबीटीई) या दोघांच्या तज्ञ समितीने महाविद्यालयातील सोयी-सुविधा व प्राध्यापकांची सखोल तपासणी करून ही मान्यता दिली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणे आणि त्यांना फार्मसी क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्यासाठी सक्षम करणे हे संस्थेचे आहे. यासाठी बाहेरच्या विद्यार्थ्यांना वसतीगृह, बस व कॅन्टीनची सुविधा उपलब्ध असल्याचेही देशपांडे, सचिव विलास भोसले व खजिनदार सोमनाथ माने यांनी सांगितले
What's Your Reaction?