मोठी बातमी | वालचंदनगर बँकेच्या भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी माजी उपाध्यक्षाच आमरण उपोषण ; उपोषणाचा आठवा दिवस

Apr 8, 2025 - 05:45
Apr 8, 2025 - 05:53
 0  588
मोठी बातमी | वालचंदनगर बँकेच्या भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी माजी उपाध्यक्षाच आमरण उपोषण ; उपोषणाचा आठवा दिवस

आय मिरर : निमसाखर प्रतिनिधी 

 वालचंदनगर सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन त्या पाच जणांवर कारवाईची मागणीसाठी अमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. जोपर्यंत सहकार आयुक्तांकडून तपासणीसाठीचा आदेश मिळत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे सतीश कसबे यांनी सांगितले. 

वालचंदनगर येथील वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या मदत केंद्रालगत मंगळवार दि.१ रोजी उपोषणास सुरुवात केली. वालचंदनगर सहकारी बँक ही वालचंदनगर कंपनी कामगारांची बँक असुन कामगारांसाठी बँकिंग सोयी सुविधा मिळाव्यात या हेतूने सन १९६० स्थापना झाली.

अशा वालचंदनगर सहकारी बँकेतच तत्कालीन व्यवस्थापक त्रिंबक शंकर क्षिरसागर, प्रभारी व्यवस्थापक जयंत दादासाहेब डोंबे, तत्कालीन चेअरमन शिवानंद किसन लावंड , तत्कालीन चेअरमन दत्तात्रय मारुती रासकर तसेच तत्कालीन चेअरमन राजेंद्र सुर्याजी रणमोडे यांनी संगनमताने केलेल्या वालचंदनगर सहकारी बँकेतील बेकायदेशीर कामकाज ,अनियमीत्ता व केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.

त्याच बरोबर बॅकेच्या त्या संबंधीत प्रकरणाची सहकार आयुक्तांच्या मार्फत चौकशी ,संबंधीतांवर कायदेशीर कारवाई बरोबरच निलंबनाची कारवाई होऊन त्याच भ्रष्टाचारातून त्यांनी मिळवलेला ऐवज , मालमत्तेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत होऊन त्यांच्यावर तातडीने फौजदारी स्वरूपाचा अपराधाचा गुन्हा दाखल होणेसाठी उपोषण सुरु आहे. 

वालचंदनगर या ठिकाणी उपोषण स्थळी सुरुवातीला ग्रामस्थ आणि कामगारांचा अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र चौथ्या दिवसापासून वालचंदनगर कंपनीचे कामगारांनी वेळोवेळी उपोषण स्थळी भेट देऊन या उपोषणास पाठिंबा दर्शवला. याचबरोबर परिसरातील व्यापारी , ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते यांनी उपोषण स्थळी भेटी देऊन पाठिंबा दिला मात्र काही स्थानिक राजकीय मंडळी यापासून लांब राहिली. दरम्यानच्या काळामध्ये पोलीस, सहकार, आरोग्य या खात्याव्यतिरिक्त अन्य जबाबदार खात्यातील अधिकाऱ्यांनी भेटी देणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक भेटी देत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. याचबरोबर सहकार खात्याकडुन योग्य ती दखल न घेतल्यामुळेही कामगार वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

वालचंदनगर सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष सतीश कसबे हे सोमवार दि.७ रोजी पासून उपोषण करत आहेत. उपोषणाला सात दिवस झाल्याने कसबे यांची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे वालचंदनगर मध्ये पुढील काळात तणावाचे वातावरण होऊ शकते. 

वालचंदनगर मध्ये रविवार दि.६ रोजी सकाळच्या वेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचा उद्घाटन निमित्त दौरा होता. भरणे घाईगडबडीत आले उद्घाटन केले आणि पुढील कार्यक्रमांसाठी निघून गेले. मात्र या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ता उपोषणाला बसलेला असताना त्या ठिकाणी भेट न दिल्यामुळे कामगारांमधुन नाराजीचा सुर पाहवयास मिळाला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow