निरा डाव्या कालव्यातून इंदापूरला शेतीसाठी मिळणार दोन उन्हाळी आवर्तने तर चार मार्चला खडकवासल्यातून सुटणार पहिले आवर्तन -आ.दत्तात्रय भरणे

Feb 24, 2024 - 13:58
 0  3335
निरा डाव्या कालव्यातून इंदापूरला शेतीसाठी मिळणार दोन उन्हाळी आवर्तने तर चार मार्चला खडकवासल्यातून सुटणार पहिले आवर्तन -आ.दत्तात्रय भरणे

आय मिरर(देवा राखुंडे)

निरा डाव्या कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी यापुढील काळात उन्हाळी हंगामातील दोन आवर्तने सोडली जाणार आहेत. तर नवा मुठा उजवा खडकवासला कालव्यातून येत्या चार मार्चपासून पहिले आवर्तन सोडले जाणार आहे. अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

शनिवारी दि.२४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे पालकमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे,आमदार राहुल कुल,कार्यकारी संचालक अतुल कपोले, पुणे पाटबंधारे विभागाचे अभियंता गुलाने, अधीक्षक अभियंता सुनंदा जगतापकार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे,पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे व इतर पाटबंधारे अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आ.भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी उन्हाळी दोन आवर्तन सोडण्यात यावी अशी आग्रही मागणी या बैठकीत केली.यावेळी उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन संपल्यानंतर खडकवासला प्रकल्पातील पाण्याचा अंदाज घेऊन भरणे यांच्या मागणीनुसार दुसरे आवर्तन उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सोडण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow