अखेर...भ्रष्ट्राचार मुक्त कारभाराला पूर्णविराम ! भिगवणच्या सरपंच दिपीका क्षीरसागर यांचा राजीनामा

Jan 26, 2025 - 10:56
Jan 26, 2025 - 11:02
 0  504
अखेर...भ्रष्ट्राचार मुक्त कारभाराला पूर्णविराम ! भिगवणच्या सरपंच दिपीका क्षीरसागर यांचा राजीनामा

आय मिरर (निलेश मोरे)

भिगवणच्या सरपंच दिपीका क्षीरसागर यांनी राजीनामा दिला असून भ्रष्ट्राचार मुक्त कारभाराला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.अत्यंत स्वच्छ, पारदर्शी आणि प्रामाणिक कारभार करत क्षीरसागर यांनी सरपंच पदाला योग्य न्याय दिल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

त्यांनी आपल्या कार्यकाळात ऑनलाईन ओपन टेंडर पद्धत वापरून ग्रामपंचायतीची लाखो रुपयांची बचत केली.तसेच त्यांनी दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करून गावच्या विकासात मोलाचे योगदान दिले. योग्य आर्थिक नियोजन करून कर्मचारी वेतन,साहित्य खरेदी व्यवहार,जमा-खर्च यांत सुसूत्रता आणली. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याच कार्यकाळात जि.प शाळेकरिता सर्वात मोठी साहित्य खरेदी टेंडरद्वारे करण्यात आली.

तसेच नामामि चंद्रभागा अंतर्गत जिल्यातील पहिलाच सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झाला,पारदर्शी कारभार करून त्यांनी गावाच्या राजकारणाला सकारात्मक दिशा देण्याचे काम केले. कोणाच्याही दबावाला बळी न पडता स्वतंत्र विचाराने गावकारभार करता येऊ शकतो हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले.ग्रामपंचायतीची विस्कटलेली आर्थिक घडी बसवून आर्थिक व्यवहार सुरळीत केले.ऑनलाईन ओपन टेंडर करणे,फिरस्ती जनावरांचा बंदोबस्त,सार्वजनिक ठिकाणी वर्गणी बंद,असे अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतले.पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन,सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता,रस्त्यांची कामे,अशी उल्लेखनीय कामे करत स्वतः आदर्श होण्यापेक्षा गाव आदर्श होईल यादृष्टीने प्रयत्न केले.

मा.मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेमुळे सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

लोकाभिमुख कामे करून सरपंच पदाला योग्य न्याय दिल्याचे समाधान आहे,अधिकचा कालावधी मिळाला असता तर एकही विकासकाम शिल्लक ठेवले नसते.सरपंच पद हे फक्त मानापानासाठी नसून यातून विकासकामे व समाजसेवा करण्यासाठी खूप मोठी संधी आहे.या कार्यकाळात ग्रामस्थांनीही खूप सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार.

--- दिपीका क्षीरसागर, मा.सरपंच,भिगवण

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow