त्याने एवढचं सांगितलं की चारचाकी नीट चालवं ! त्याला थेट बोनेटवरचं घेतलं,दीड ते दोन किलोमीटर फिरवलं,हे सार विद्येच्या माहेरघरात घडलं
आय मिरर
किरकोळ वादातून ऑडी कार चालकांनी,एका तरुणाला ठोकरल्याने तो बोनेटवर पडला आणि कार चालकाने त्याला त्याच अवस्थेत दीड ते दोन किलोमीटर, फिरविल्याचा धक्कादायक प्रकार विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे.
या घटनेची ही सीसीटीव्ही दृश्य ही समोर आली आहेत.अक्षरश: थरकाप उडवणारी दृश्य असून चारचाकी चालक त्या तरुणाला आपल्या चारचाकीच्या बोनेटवर घेऊन जाताना दिसत आहे.दरम्यान घटनेतील तरुणाला धडक देणारी कार अजूनही जप्त करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
कार चालकांचा हा मस्तवालपना असून संबधित तरुणाच्या जीवावर बेतणारा ठरला असतां,अशीच चर्चा सद्या सुरू आहे.या घटनेत जेकरी या जेकब मैथ्यु नामक तरुण किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान कार नीट चालव असं सांगीतल्याच्या कारणावरून,कार मध्ये बसलेल्या तरुणांनी आपल्याला जबर मारहाण केली आणि जिवे मारण्याच्या उद्देशाने कार ने धडक दिली असतां
आपण बोनेट्वर पडलो आणि त्याच अवस्थेत कार चालकांनी आपल्याला दीड ते दोन किलोमीटर फिरवले.केवळ, बॉनेटला घट्ट पकडले आणि दैव बलवत्तर असल्या कारणाने आपण वाचलो अशी फिर्याद जखमी तरुणाने पोलिसात नोंदविली आहे.
तर तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार कार मधील तरुण हेमंत म्हासाळकर, कमलेश पाटील, प्रथमेश दराडे एक अज्ञात तरुणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून,एक आरोपी अटक तर इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली आहे.
What's Your Reaction?