पवार कुटुंबाचे आणि इंदापूरचे सहा दशकांचे ऋणानुबंध,पंधरा वर्षे प्रेम आणि आशीर्वाद दिले पुढेही ऑन मेरिट पास करा - खा.सुप्रिया सुळे

Oct 8, 2023 - 22:39
 0  662
पवार कुटुंबाचे आणि इंदापूरचे सहा दशकांचे ऋणानुबंध,पंधरा वर्षे प्रेम आणि आशीर्वाद दिले पुढेही ऑन मेरिट पास करा - खा.सुप्रिया सुळे

आय मिरर

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी दि.15 ऑक्टोंबर रोजी इंदापूर न्यायालयाच्या नूतन इमारतीची पाहणी करत वकिल मंडळींशी संवाद साधलाय.यावेळी पवार कुटुंबाचे आणि इंदापूरचे सहा दशकांचे ऋणानुबंध आहेत ते जपण्याचा प्रयत्न मी पंधरा वर्षे केला आहे. तुमच्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद पंधरा वर्षे राहिलेले आहेत पुढेही असेच राहू द्या आणि ऑन मेरिट मला पास करा असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूरात केले.इंदापूरकरांनी साहेब दादा माझे दुसरे बंधू श्रीनिवास पवार आणि मला जे प्रेम दिले त्याचे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही. त्या नात्यांचा ओलावा मी कायम जपेल असं ही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

राज्यसरकार आरोग्याच्या बाबतीत संवेदनशील नाही.पालकमंत्री बदलण्यासाठी स्वतंत्र विमान दिल्लीला जाऊ शकते पण हे नांदेडमधील दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झालेल्या बालकांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसण्यासाठी कोणालाही वेळ नाही.असा टोला बारामती लोकसभा संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

इंदापूर येथील न्यायालयामध्ये इंदापूर वकील संघटनेच्या वतीने वकिलांशी संवाद प्रसंगी खा.सुळे बोलत होत्या.यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, पक्षाचे कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, महारुद्र पाटील, सागर मिसाळ, अशोक घोगरे, छाया पडसळकर यांचेसह बार असोसिएशनचे वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

यावेळी बोलताना खा.सुळे पुढे म्हणाल्या, बारामतीच्या खांद्याला खांदा लावून मला इंदापूर ने मतदान केले. या भागातील प्रश्न गेली 15 वर्षे सातत्याने मांडण्याचे काम केले. इंदापूर तालुक्यात झालेल्या विकासामध्ये महा आघाडीचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचेही योगदान महत्वाचे आहे.  

कोर्टात एकमेकांसमोर असलेले विरोधी वकील पुन्हा एकत्र येऊन चहा घेतात. पण राजकारण व वकील यामध्ये फरक आहे. मात्र मी सत्ता, विरोध या पेक्षा वैचारिक बैठकीला प्राधान्य देते.राजकारणात दिमाग ॲक्टिव व दिल बढा होणं चाहिए असेही सांगितले.

यावेळी वकील संघटनेच्या वतीने इंदापूर येथे अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय स्थापन करण्याची मागणी तसेच ई लायब्ररी मागणीसह वकील सुरक्षा कायदा याबाबतचा आराखडा देण्यात आला. यावर खा.सुळे यांनी संबंधित विभागाकडे याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष ॲड.नरेंद्र शहा यांनी सूत्रसंचालन ॲड असिफ बागवान यांनी तर आभार अनिल पारेकर यांनी मानले.

सत्ता येते जाते नाती कायम असतात…

सत्ता येत असते सत्ता जात असते नाती मात्र कायम असतात जर देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना मुख्यमंत्री करत असतील तर त्यांना पहिला हार घालण्याचा मान मला दिला जावा अशी विनंती मी त्यांना करेल.असे सांगत राजकारणाबरोबरच नाती ही महत्वाची असल्याचे दर्शविले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow