ब्रेकिंग || इंदापूरात पोलीस उपनिरीक्षकासह खाजगी वकिलाला 20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

Oct 23, 2023 - 07:07
 0  6926
ब्रेकिंग || इंदापूरात पोलीस उपनिरीक्षकासह खाजगी वकिलाला 20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

आय मिरर (विजयकुमार गायकवाड)

इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये पोलीस उपनिरीक्षकासह आणि खाजगी वकिलाला 20 हजाराची लाज घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेय… पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे आणि मधुकर कोरडे असं वकील आरोपीचे नाव आहे. 

यातील लाच स्वीकारणारे प्रवीण सुग्रीव लोकरे हे भिगवण पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.भिगवण पोलीस स्टेशन समोरचं ही कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारदाराच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. ज्या वाहनाने धडक दिली होती त्याच्या गाडीच्या इन्शुरन्सची कागदपत्रे देण्यासाठी आरोपीने तक्रारदारास 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदाराने याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.त्यानंतर सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपनिरीक्षकाला आणि वकिलाला २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. 

सदरची लाच ही खाजगी वकील कोरडे यांनी लोकरे यांच्याकरिता पंचासमक्ष स्वीकारली असून त्यांच्या लाच मागणीस प्रोत्साहन दिले आहे. त्या दोघांनाही ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सदरची कारवाई ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक,डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वीरनाथ माने,पो.हवा. नवनाथ वाळके,पो. शि.माने,पो. शि.कांबळे चालक स.पो.फौज.जाधव यांच्या पथकाने केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow