शुक्रवार पासुन इंदापूरात 'मालोजीराजे व्याख्यानमाला'
आय मिरर(देवा राखुंडे)
इंदापूर -इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरात मालोजीराजे व्याख्यानमालचे आयोजन करण्यात आले आहे.कोरोना काळात तीन वर्षे व्याखानमाला झाली नव्हती.व्याखानमालेचे हे १५ वे वर्षे असलेची माहिती मालोजीराजे व्याखानमाला समितीचे अध्यक्ष आयोजक नगरपरिषदेचे माजी गटनेते कैलास कदम यांनी दिली.शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी ते १८फेब्रुवारी पर्यंत दररोज सायंकाळी सात वाजता शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिर येथे व्याखानमाला होणार आहे.
मालोजीराजे व्याखानमालेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते होणार असून प्रथम पुष्प अभय भंडारी (विटा) हे "भारतीय संस्कृती व २१वे शतक"या विषयावर गुंफणार आहेत.अध्यक्षस्थानी सोनाई परिवाराचे युवा उद्योजक जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने असून प्रमुख मान्यवर म्हणून अनुराधा गारटकर, पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे,भरत शहा,अलका ताटे, डॉ.कल्पना खाडे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.प्रकाश वाघमोडे उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी द्वितीय पुष्प सचिन पवार (पुणे) हे " संत परंपरा आणि छत्रपती शिवराय" या विषयावर गुंफणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरेकर माऊली फडप्रमुख ह.भ.प श्रीगुरू हरिदास बोराटे असणार आहेत तर प्रमुख मान्यवर म्हणून शिवाजीराव मखरे,अमर गाडे, वसंतराव माळुंजकर, अनिकेत वाघ, गफूरभाई सय्यद, इंजि.सोमनाथ गवळी उपस्थित राहणार आहेत.
तृतीय पुष्प रविवार दि.१८ रोजी महाराष्ट्र विधी विद्यापीठ मुंबई चे कुलसचिव डॉ.प्रा.ॲड.प्रतापसिंह साळुंके (पुणे) हे "संविधानातील मौनाची भाषांतरे"या विषयावर गुंफणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे असून प्रमुख मान्यवर म्हणून उज्वला राऊत,अरूण होळकर,मनोज मोरे,माधवी सोननीस,जयंत नायकुडे, विकास खिलारे उपस्थित राहणार आहेत.
इंदापुर शहर व परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहणेचे आवाहन व्याखानमाला समितीचे कार्याध्यक्ष सुनील गलांडे व सचिव प्रा.भास्कर गटकूळ यांनी केले आहे.
What's Your Reaction?