निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावं - नगरसेविका हेमलता मालुंजकर
आय मिरर
वृक्षारोपन ही काळाजी गरज असून निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने आता दोन पावले पुढे आले पाहिजे.आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी वृक्षारोपण केलं असून भविष्यात हि झाडे मोठे कशी होते यासाठी काळजी घेऊ, प्रत्येक तरुणांनी आपल्या वाढदिवशी खर्च टाळून एक तरी झाड लावावं आणि निसर्ग संवर्धनाला आपला हातभार लावावा असे आवाहन इंदापूर नगर परिषदेच्या नगरसेविका हेमलता मालुंजकर यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ इंदापूर, रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल व इंदापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रो. हेमलता मालुंजकर नगरसेविका इंदापूर नगरपरिषद यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
इंदापूर नगरपरिषद च्या पाठीमागील बाजूस हे वृक्षारोपण करण्यात आले असून शहा नर्सरी यांनी यासाठी मोफत झाडांचा पुरवठा केला आहे.इंदापूर शहरातील शहा नर्सरी कडून यासाठी शहर आणि पंचक्रोशीत मोफत झाडे पुरविली जातात आम्हाला देखील आज शहा नर्सरी कडून मोठे सहकार्य मिळाले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. असं मालुंजकर म्हणाल्या.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ इंदापूर चे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, मुख्याधिकारी रमेश ढगे, एन्व्हायरमेंट डायरेक्टर वसंतराव माळुंजकर, रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल चे अध्यक्ष तथा झोन 3 चे एजी समन्वय ज्ञानदेव डोंबाळे, रोटरी क्लब इंदापूर चे अध्यक्ष मोरेश्वर कोकरे, नगरसेवक स्वप्निल राऊत, मा. नगरसेवक अनिल राऊत, मा. नगरसेवक तथा संस्थापक अध्यक्ष युवा क्रांती प्रतिष्ठान रो. प्रशांत सिताप, धरमचंद लोढा, डिस्ट्रिक्ट झोनल फाऊंडेशन डायरेक्टर रो. नरेंद्र गाधी, रो. राजाराम सागर, रो. डॉ. प्रताप कदम, रो. समीर सूर्यवंशी, रो विष्णु पवार, रो. सुधिर शेंडे साहेब, रो अप्पासाहेब बडंगर, रो. तानाजी दडस, तात्यासाहेब वाघमारे, रो. मंदा डोंबाळे, रो. सोनाली कदम, चारुशिला शिंदे, सौ. ऊज्वला बंडगर आणि अंकुश राव नगरपलिकेचे अशोक चिंचकर आदी उपस्थीत होते.
What's Your Reaction?