बिग ब्रेकिंग | पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काळेवाडी परिसरात इथेनॉलचा टँकर पलटला

Feb 24, 2024 - 08:11
 0  596
बिग ब्रेकिंग | पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काळेवाडी परिसरात इथेनॉलचा टँकर पलटला

आय मिरर(देवा राखुंडे)

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील काळेवाडी नंबर दोन गावाच्या हद्दीत मल्टी एक्सल टँकर पलटी होऊन अपघात झाला आहे.पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या या टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने शनिवारी पहाटेच्या दोन च्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम एच 03 सीपी 5337 क्रमांकाच्या टँकर वरील चालक मोहम्मद अहमद खान वय 30 वर्ष रा. रसूलपुर ता.रामपूर जि.सुलतानपूर उत्तर प्रदेश टँकर मध्ये इथेनॉल केमिकल भरून तो सोलापूर बाजूकडे निघाला होता. दरम्यान इंदापूर तालुक्यातील काळेवाडी नंबर दोन या ठिकाणी आला असता त्याला झोपेचा डुकला लागला आणि यामध्येच या टँकरला अपघात झाला.या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर इथेनॉलची गळती झालेली आहे.

अपघाताची घटना समजताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना आणि इंदापूर नगर परिषदेची अग्निशामक यंत्रणा अपघातस्थळी दाखल झाली होती. दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती आणि हा टँकर बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

अपघात स्थळी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी इंदापूर पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिंदे,पोलीस हवालदार दत्तात्रय मदने आणि पोलीस हवालदार जगताप हे अपघात स्थळी दाखल झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow