इंदापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे अपहरणाचा डाव फसला ; वाचा नेमकं काय घडलं

आय मिरर
ऊस तोडणी मजुरापोटी झालेल्या आर्थिक व्यवहारातून हडपसर येथून एकाचे अपहरण करून पुणे सोलापूर महामार्गावरून घेऊन जात असल्याची माहिती हडपसर पोलिसांकडून इंदापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी नाकाबंदी लावत सदर चारचाकी वाहनाचा शोध घेत अपहरण केलेल्या व्यक्तीची सुटका केली. तर यामध्ये सहभागी असलेल्या चौघांना ताब्यात घेत हडपसर पोलिसांच्या स्वाधीन केले. इंदापूर पोलिसांच्या या कार्यतत्पर कामगिरीचे कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार (ता.08) रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान हडपसर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना संपर्क सादर हडपसर येथून राजेंद्र नेताजी चव्हाण (रा. होली ता.लोहार जिल्हा धाराशिव) याचे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी मधून (नंबर MH 01 AC 0078) अपहरण करण्यात आले असून त्यास सोलापूरच्या दिशेने घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे कळविले.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक फौजदार प्रकाश माने, सुनील बालगुडे, पोलीस हवालदार संजय मल्हारे व इतर पोलीस कर्मचारी यांच्यामार्फत दोन पथके तयार करीत नाकाबंदी केली.यावेळी रात्री 9 वाजताच्या दरम्यान वनगळी गावच्या हद्दीत हॉटेल लीलाज जवळ सदर वाहन पोलिसांना आढळले यावेळी अतिशय चतुराईने कारवाई करीत अपहरण करण्यात आलेली व्यक्तीची सुटका केली.तसेच यामध्ये सहभागी आरोपी यांना वाहनासह पोलीस पथकाने ताब्यात घेतले.
त्यानंतर अपहरणकर्ते विक्रम लालू जाधव, अजित व्यंकट पाटील, अंकुश मोहिते, ज्ञानोबा वाघमारे (सर्व रा. एकोची मुदगड ता.निलंगा) यांना हडपसर पोलीस स्टेशनचे कर्मचारी श्रीकांत पांडूळे, ज्योतीबा पवार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. इंदापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे अपहरणाचा डाव फसला. पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.
What's Your Reaction?






