फायनान्सवाले आहोत सांगून चोरीच्या दुचाकी ग्राहकांना फसवून विकायचे,इंदापूर पोलीसांनी करेक्ट कार्यक्रम केला
आय मिरर(देवा राखुंडे)
इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला चोरीस गेलेल्या 13 मोटरसायकल हस्तगत करण्यात यश मिळाले असून या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.बाबासाहेब नारायण राऊत वय २७ वर्षे रा शेज बाभुळगाव ता.मोहोळ जि.सोलापुर व गणेश भारत हेरकळे वय २७ रा अंकुली ता.मोहोळ जि.सोलापुर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.०५ फेब्रुवारी रोजी इंदापुर बस स्थानकातून एक युनिकॉर्न मोटारसायकल चोरीस गेले बाबत इंदापुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे पो.उप निरीक्षक राळेभात, सहा फौजदार प्रकाश माने, पो. ना. खान, पो.शि.चौधर, पो.शि.जाधव, पो.ना. रासकर यांना गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यावरून गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून फिर्यादीचे मदतीने संशयीत आरोपी बाबासाहेब नारायण राऊत यास ताब्यात घेतले व गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर अधिक तपास करून त्याचा साथीदार मित्र गणेश भारत हेळकर याचा शोध घेवुन त्यास अटक केली व दोघांकडे विचारपुस केली असता त्यांचेकडुन इतर १२ मोटारसायकल जप्त केल्या.
सदर इसम हे फायनान्स कंपनीचे लोक आहेत अशी लोकांना बतावणीकरून चोरून आणलेल्या गाड्या ग्राहकांना देत असत व मिळेल तेवढे पैसे घेवुन काही काळाने कागदपत्र येताच गाडी नावावर करून देतो असे सांगत होते. १३ मोटारसायकल पैकी ८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यामध्ये टेंभुर्णी, मोहोळ, दौंड, अकलुज, सलगरवस्ती, कुर्डुवाडी येथील गुन्हयातील गाडयांचा समावेश आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप निरीक्षक रोळेभात, सहा फौज प्रकाश माने हे करीत आहेत.
What's Your Reaction?