शहा कुटुंबाने दिलेला शब्द पाळला ! इंदापूर नगरपरिषदेचे ६४ कामगार झाले कायम 

Feb 28, 2024 - 20:16
 0  1157
शहा कुटुंबाने दिलेला शब्द पाळला ! इंदापूर नगरपरिषदेचे ६४ कामगार झाले कायम 

आय मिरर(देवा राखुंडे)

इंदापूर नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामावर कायम करण्याचा प्रश्न, मागील २५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न होता. यासाठी अनेक प्रयत्न झाले. नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी नगराध्यक्षपदावर येताच, त्यांनी २०१८ साली या ६४ कामगारांना कायम करण्यासाठी, नगरविकास खाते विभागाला स्वतः प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर मागील सात वर्षात उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी मुंबई मंत्रालयात नगरविकास खात्यामधील सचिव यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.

त्यानंतर अनेक वेळा भरत शहा यांनी मुंबई मंत्रालयात जावून, संबंधित कामगारांना कायम करण्यासाठी विविध लागणारे कागदपत्रांची पूर्तता त्या विभागात केली. त्यामुळे कमी बोलून जास्त काम करणारे भरत शहा यांची मेहनतीने रंग आणले आहे. संबंधित कामगारांनी वेळोवेळी शहा कुटुंबाला वेळोवेळी विनंती केली होती. त्यावेळी शहा कुटुंबातील भरत शहा यांनी या कामगारांना शब्द दिला होता. कामगारांना कायम करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार, तेव्हा पासून मागील पाच ते सह वर्षे भरत शहा यांनी सखोल पाठपुरावा केला.

यामध्ये इंदापूर नगरपरिषदेचे कर्मचारी विजयकुमार शिवाजी भोसले,चंद्रशेखर शिवाजी बोडके, सतिश चंद्रकांत बोरीकर, देविदास दशरथ व्यवहारे, आकाश त्रिंबक ताडे, कदीर ईस्माईल पठाण, मच्छिंद्र सदाशिव जामदार, भागवत मुरलीधर ननवरे, उद्धव अर्जुन कवितके, शेरखान रशीद पठाण, सुरेश गोविंद शिंदे, हरी बाबुराव शिंदे, श्रीधर लक्ष्मण बाब्रस, देविदास गणपत कुंभार, संतोष प्रकाश कोथमिरे, अंकुश श्रीपती बोराटे, दादाराम अर्जुन राऊत, प्रकाश व्यंकटेश जोशी, संजय ज्ञानेश्वर कवडे, रत्नाकर श्रीधर जोशी, श्रीमती लता नन्नु चव्हाण,शरद महादेव स्वामी, मिलिंद वासुदेव गुजर, तानाजी मच्छिंद्र चव्हाण, सुधीर दिगंबर तुरे, अरुण महादेव शिंदे,अंबादास महादेव नाळे, अशोक गजानन चिंचकर, राजेंद्र शिवदास शेवाळे, सोमनाथ दत्तात्रय घोलप, किरण सुर्यकांत गायकवाड, मनोज हनुमंत भापकर, संतोष अर्जुन सुर्यवंशी, सुभाष धोंडिबा देवकाते, भागवत विठ्ठल जाधव, रमेश लक्ष्मण उकिरडे, युवराज मल्हारी शेलार,नसीर फकरुद्दीन मोमीन, मोहन भानुदास ढोबळे, पांडूरंग अर्जुन माने, चंद्रशेखर रामलिंग मोदळे, बाळू राणू माने,बाळू नारायण मखरे, कुंदन सर्जेराव माने, श्रीमती मीना पांडुरंग चव्हाण, पांडूरंग शंकर व्यवहारे, श्रीमती रेणूका दुर्योधन मखरे, श्रीमती कांताबाई पांडूरंग भिसे, श्रीमती मंगल विष्णू मखरे, श्रीमती मीरा काळू खिलारे, विष्णू हिरामण ढावरे, अजीम दगडू शेख, दिपक रतन कवितके,अल्फाद दुलेखान पठाण, वैभव भगवान देशमाने, विलास बाबुराव चव्हाण, सुनिल बलभिम कुंभार, किशोर प्रेमचंद होमकर, रमेश नारायण शिंदे, मोहन भगवान शिंदे,देविदास दिनकर शिंदे, सुर्यकांत चंद्रकांत भंडारी, सुरेश जगन्नाथ सोनवणे, अंबादास भागवत जाधव या ६४ कर्मचाऱ्यांची कायम नियुक्ती झाली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याचे उप सचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी अद्यादेश काढला आहे. 

भरत शहा यांच्या मुंबई वाऱ्या ठरल्या यशस्वी

इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्य भरत शहा यांनी कामगारांना दिलेल्या शब्दाप्रमाणे, सात वर्षात जवळपास पंचवीस वेळा स्व खर्चाने, मुंबईला गेले. तेथील संबंधित अधिकाऱ्यांना या कामगारांची अडचण सांगितली. ती अडचण अधिकाऱ्यांनी समजून घेतली. त्यांनंतर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी हा प्रश्न अतिशय महत्वाचा असल्याने, त्याची विशेष पुरवणी तयार केली. त्यानंतर तो विषय मार्गी लागला. त्यामुळे भरत शेठ शहा यांनी या विषयाच्या पाठपुराव्यासाठी केलेल्या मुंबई वाऱ्या यशस्वी ठरल्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow