पुणे सोलापूर महामार्गावर एकास चिरडले,लोणी देवकर गावच्या हद्दीत घडला अपघात

Oct 20, 2023 - 17:30
 0  4611
पुणे सोलापूर महामार्गावर एकास चिरडले,लोणी देवकर गावच्या हद्दीत घडला अपघात

आय मिरर

इंदापूर नजीक पुणे सोलापूर महामार्गावर भिषण अपघात झालाय. अज्ञात वाहनाने एकास चिरडले असून यात 30 वृषीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.गुरुवारी दि.१९ आँक्टोंबर रोजी रात्री नवू ते सव्वा नवू च्या सुमारास हा अपघात घडल्याचा अंदाज आहे.कृष्णा वैजनाथ लाड असं मृत व्यक्तीचे नांव असून ती पुणे भोसरी येथील रहिवासी आहे.

लोणी देवकर गावच्या हद्दीत हाँटेल संकेत समोर हा अपघात घडल्याची माहिती डाळज येथील महामार्ग पोलीसांनी दिली आहे.अज्ञात वाहनाने भरधाव वेगात या दुचाकीस्वारास चिरडल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला असून घटनास्थळी डाळज मदत केंद्राचे महामार्ग पोलीस दाखल झाले होते.

मयत इसम सुट्टी काढून मित्राबरोबर तुळजापुरला दर्शनाला गेला होता मित्र तिकडेच थांबला हा एकटाच परत पुणे भोसरी कडे MH 12 TG 5261 या दुचाकीवरुन निघाला होता.याच दरम्यान त्याच्या दुचाकीला अपघात झाला.यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow