फिरण्यासाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीला बारामती विमानतळा जवळ लूटले,कपडे उतरवायला लावून काढले नको त्या अवस्थेत फोटो

May 12, 2024 - 21:07
 0  825
फिरण्यासाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीला बारामती विमानतळा जवळ लूटले,कपडे उतरवायला लावून काढले नको त्या अवस्थेत फोटो

आय मिरर

बारामतीतील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली एक युवती मोटारीतून आपल्या मित्रासह बारामती विमानतळ परिसरात फिरण्यासाठी गेली होती. ते मोटारीत बसले असता तेथे आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवत युवतीच्या अंगावरील 90 हजारांचे दागिने काढून घेत दोघांचे कपडे बळजबरीने काढायला लावत त्यांचे नको त्या अवस्थेतील फोटो काढलेत. शिवाय हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बेदम मारहाणही केलीय.

बारामती पोलिसांनी दोन अनोळखी अज्ञातांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.ही घटना बारामती तालुक्यातील विमानतळाजवळ गोजुबावी गावाच्या हद्दीत घडलीय. 

विमानतळाच्या बाजूला फिरत असताना 30 ते 35 वयोगटातील तोंडाला मास्क लावलेले दोघे तिथे आले.त्यांनी युवती सह तिच्या मित्राला चाकूचा धाक दाखवून युवतीच्या गळ्यातील 70 हजारांची सोन्याची साखळी व कानातील टॉप्स असे 90 हजारचे दागिने काढून घेतले.त्यानंतर त्या दोघांनी तिच्या मित्राला दगडाने मारहाण केली. दोघांनाही गाडीतून बाहेर काढत खड्डा असलेल्या ठिकाणी त्यांच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने उतरायला भाग पाडत त्यांच्या त्या अवस्थेतील फोटो काढून घेतले.पोलिसात गेला तर तुमचे काढलेले फोटो व्हायरल करू अशी धमकी देण्यात आलीय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow