इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे अद्यापनाचे कार्य कौतुकास्पद - अनिता खरात
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता अतिशय सुंदर असून जिल्हा परिषदेचे शिक्षक अतिशय सुंदर अशा प्रकारे मुलांना समाजात सर्व गोष्टीचे ज्ञान कसे होईल या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बाब अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरोव्दार तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता खरात यांनी इंदापूर येथे काढले.
मंगळवार दि.०५ सप्टेंबर रोजी इंदापूर येथे तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला.यानिमित्त शिक्षकांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी त्या बोलत होत्या.
खरात म्हणाल्या, की सध्या शासनाने ही शिक्षकांसाठी जेवढे होईल तेवढे जास्तीत जास्त सवलती उपलब्ध करून द्याव्यात. तसेच शिक्षकांना शिकवण्या व्यतिरिक्त ईतर कामात शासनाने गुंतवून पाडू नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी यावेळी संतोष हेगडे अध्यक्ष जुनी पेन्शन हक्क संघटना ,सुहास मोरे अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना, मंगेश शेंडे अध्यक्ष इष्ठा शिक्षक संघटना, सतीश शिंदे अध्यक्ष शिक्षक भारती संघटना यांसह इतर शिक्षक बंधू , गणेश शिंगाडे, दुर्योधन पाटील, अरुण भोसले बारामती महिला तालुकाध्यक्षा सुनंदा रणवरे इतर मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?