रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या वतीने शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान

Sep 5, 2023 - 20:33
Sep 5, 2023 - 21:25
 0  726
रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या वतीने शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान

आय मिरर

रोटरी क्लब ऑफ इंदापूर च्या वतीने मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. इंदापूर शहरातील तीन शाळांमध्ये जाऊन तेथील सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प व एक भेट देऊन त्यांना संन्मानीत करण्यात आले. 

शहरातील प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी सर्वप्रथम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.त्यानंतर सौ.कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालय या ठिकाणी सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे त्याच विद्यालयाच्या सौ.काळे यांना रोटरी एक्सलन्स व्होकेशनल अवॉर्ड या सन्मानाचे मानपत्र शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांनी त्यांच्या तीस वर्षाच्या कालखंडामध्ये चांगल्या प्रकारची शिक्षण देण्याचे काम केले. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना या सन्मानाने रोटरी कडून गौरवण्यात आले आहे. त्यानंतर नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. 

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष आझाद पटेल, रोटरी डिस्ट्रिक्टचे व्होकेशनल डायरेक्टर वसंतराव माळुंजकर ,रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वन चे मेंबरशिपचे को डायरेक्टर ज्ञानदेव डोंबाळे, डिस्ट्रिक्ट फाऊडेशन टीमचे झोनल डायरेक्टर नरेंद्र गांधी, डिस्ट्रिक्ट सिनर्जी टीमचे झोनल डायरेक्टर राकेश गानबोटे, क्लबचे सचिव प्रशांत भिसे, क्लबचे खजिनदार भीमाशंकर जाधव, ज्येष्ठ सदस्य प्रमोद भंडारी, क्लब वोकेशन डायरेक्टर धरमचंद लोढा पुढील वर्षाचे अध्यक्ष मोरेश्वर कोकरे, सुनील मोहिते, समीर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow