कुस्ती स्पर्धेत यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा राजवर्धन पाटील यांच्या हस्ते झाला सन्मान  

Sep 5, 2023 - 19:29
 0  236
कुस्ती स्पर्धेत यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा राजवर्धन पाटील यांच्या हस्ते झाला सन्मान   

आय मिरर

क्रीडा व युवक संचनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे आयोजित इंदापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दि. ३१/०८/२०२३ ते दि. ०२/०९/२०२३ या कालावधीमध्ये मारकड कुस्ती केंद्र इंदापूर या ठिकाणी संपन्न झाल्या. राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्यू. कॉलेज, इंदापूर विद्यालयातील खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सुयश प्राप्त केले. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांच्या हस्ते या गुणवंत खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.  

कु. गायत्री शिंदे ,कु. ज्ञानेश्वरी शिंदे , चि. यशराज चोरमले , चि.विशाल कारंडे ,चि. शुभम हजारे , कु. वैष्णवी पारेकर कु. श्रावणी गवळी ,चि. आदेश चोरमले ,चि. कृष्णा बोडके,चि. विवेक व्यवहारे या विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत यश संपादन केले त्यांचा सत्कार राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.      

या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक अण्णासाहेब खटके यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोरटे, उपमुख्याध्यापक दादा चौधरी, पर्यवेक्षक रघूनाथ पन्हाळकर, राजेंद्र कदम व खैरूनिसा शेख व क्रीडा विभाग प्रमुख यशवंत केवारे यांनी गुणवंत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम कामगिरी करीत पुढील स्पर्धेमध्ये आपल्या प्रशालेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow