सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी इंदापूरात पार पडले भैरवनाथ प्रतिष्ठान आणि माळी महासंघाच्या वतीने रक्तदान शिबीर
आय मिरर
इंदापूरातील बावडावेस माळी गल्ली येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भैरवनाथ प्रतिष्ठान आणि माळी महासंघाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यात 98 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहभाग नोंदवला.
रक्तदानाच्या संकल्पनेतून एखाद्याचा जीव वाचू शकतो हा ध्यास मनी धरून हे रक्तदान शिबीर राबवले. सर्व स्तरातून युवा पिढीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.त्यातून आम्हाला भविष्यात असे उपक्रम राबवण्याची ऊर्जा मिळाली असल्याची प्रतिक्रिया माळी महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष विकास शिंदे यांनी दिली.
सावित्रीबाई फुले यांनी जात धर्म न पाहता मुलींना शिक्षण सुरु केले. पहिल्यांदा शाळेत केवळ सातच मुली होत्या परंतु त्यात एकही माळी समाजाची नव्हती हे खास वैशिष्ट्ये. म्हणूनच शिक्षणाचे त्यांचे महत्त्व आजची पिढी आजमावत आहे.शिक्षण घेतले की कुठलाही माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे ही विकास शिंदे यांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमास बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव एडवोकेट राहुल मखरे,तेजपृथ्वी गृपच्या अनिता खरात,माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,माजी उपनगराध्यक्ष पांडूरंग शिंदे, सुरेश गवळी, माजी नगरसेवक कैलास कदम,अनिल राऊत,पोपट शिंदे, दादासाहेब सोनवणे डॉ. सुहास सातपुते, सुभाष खरे, कीर्तीकुमार वाघमारे, रमेश शिंदे, दादासाहेब कुदळे, बबन क्षीरसागर, बंटी सोनवणे, अजिंक्य जावीर,शुभम पवार, गौरव राऊत, सुरेश व्यवहारे, नानासाहेब खरात, संतोष देवकर, सुनील बोराटे यांसह माळी महासंघाचे सर्व पदाधिकारी, भैरवनाथ प्रतिष्ठानचे पदाधिकारी मित्र परिवार उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळी संघाचे उपाध्यक्ष युवराज शिंदे,विष्णु शिंदे,पवन शैलेश शिंदे, ऋषिकेश किरण शिंदे,अनिकेत शिंदे,सोमनाथ शिंदे,बापू शिंदे,तुकाराम शिंदे,अक्षय गणेश राऊत,बापूराव शिंदे, रामचंद्र शिंदे यांसह सर्व माळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्याचं विकास शिंदे यांनी सांगितले.
What's Your Reaction?