बिग ब्रेकिंग | अजितदादांच्या उपस्थितीतचं भाजपा आमदाराची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण ; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Jan 5, 2024 - 12:53
 0  1149
बिग ब्रेकिंग | अजितदादांच्या उपस्थितीतचं भाजपा आमदाराची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण ; पुण्यातील धक्कादायक प्रकार

आय मिरर

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी ही घटना घडली.

कोणाला केली मारहाण

भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण केली. यामुळे कार्यक्रमस्थळी सर्वच जण आवाक झाले. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रमात ही घटना घडली. सातव यांना मारहाण का झाली ? याचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु या प्रकारामुळे अजित पवार नाराज झालेले दिसत होते.

अजित पवार यांनी पुण्यात विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. आपण नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमाला जाणार नाही, माझे कुठेही नाव टाकतात, असे त्यांनी म्हटले. आता नव्याने आलेल्या कोरोना व्हेरियंटची तीव्रता एवढी नाही. परंतु कोरोना वाढू नये. यासाठी दक्षता घेतली पाहिजे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow