दादा मामा भाऊ झिरो होणाऱ्यातील नाहीत,या माणसांनी तालुक्यासाठी रक्त ओकलेय : आप्पासाहेब जगदाळे
आय मिरर
पुण्याच्या इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा थेट सामना पाहायला मिळत असून जिल्हा परिषद गटांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. नगरपरिषद निवडणुकीमध्ये म्हणत होते झिरो करू पण उपमुख्यमंत्री अजित पवार कृषिमंत्री दत्ता भरणे सुप्रिया सुळे हर्षवर्धन पाटील यांसारखी माणसं झिरो होणाऱ्यातील नाहीत, या माणसांनी या तालुक्यासाठी रक्त ओकले आहे.असं म्हणत जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
आप्पासाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीत इंदापूरच्या महादेवनगर मध्ये वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार यशराज जगदाळे, माळवाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार कल्पना पाटील आणि वडापुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार अर्चना खबाले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली.या सभेत आप्पासाहेब जगदाळे बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदार उपस्थित होते.
जगदाळे म्हणाले की,गेल्या आठ दिवसापूर्वी अजित पवारांनी आम्हाला पुण्यात बोलावले होते.त्याठिकाणी शरद पवार साहेबांनी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे असं सांगितलं.त्यावेळी आम्ही त्यांचा आवाज ऐकला,त्यांच्या मनातील भावना आम्ही जाणल्या आम्ही काही क्षण स्तब्ध झालो आणि क्षणात आम्ही निर्णय घेतला.आम्ही एकत्र येण्यास सहमती दर्शवली.
मागील महिन्यात आम्ही इंदापूर नगरपरिषद निवडूक एकमेकांच्या विरोधात लढलो पण ते सोडून दिले आणि एकत्र आलो.आता तुम्ही ही झालं गेल सोडून द्या आणि एकत्र या.आपले सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती चे सर्व उमेदवार निवडून येतील यासाठी ताकदीने काम करा.अनेकांनी उमेदवारी मागितली होती,एकास एक तोडीचे उमेदवार होते,पण उमेदवारी कोणालातरी एकाला मिळत असते. ज्याने उमेदवारी मागितली होती त्यांनी या ठिकाणी एक पाऊल मागे घेतले म्हणजे आपलं राजकारण संपलं अस काही नाही.आपण चार पाऊल मागे सरकलो तर आणखी जोमाने पुढे जातो याचा अनुभव मला स्वतःला आहे.
हा नीरा भीमाचा संगम आहे,हा योग सहज जुळत नाही तो जोडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले आहे.मी जिल्हा बँकेवर काम आहे आणि तिथून जिल्हा परिषद जवळच आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणी असतील तर मला कधीही सांगा सहज तुमच्या कामासाठी आम्ही उपलब्ध असू.माझा मुलगा तर लहान आहे त्याला आपला मुलगा समजून प्रेम करा आणि माझ्या मुलासह दोन्ही उमेदवार निवडून द्या.
कोण म्हणतो उमेदवार आयात आहे पण माझी गलांडवाडी मध्ये शेती आहे कोणाला माहित आहे का ? आणि उमेदवाराच्या नावावर आहे. कोणाला उतारा पहायचा असेल तर तो ही दाखवतो.आता म्हणतात ही एक झाली मग महिन्यापूर्वी एक कोण झाले होते ?
मला कोणीतरी सांगितले की कोण आतून मदत करणार आहेत पण मला सांगायचे आहे की आतून एक बाहेरून एक नसावं.समोरून वार करा पाठीमागून करू नका,काय केलंय माझ्या बाळाने माझ्यावर समोरून वार करा.आपल्याला अजित पवार दत्तात्रय भरणे सुनेत्रा पवार सर्वजण विकासाचा निधी देणार आहेत.पुढील पाच वर्षात सर्व कामे होतील असं नाही पण आम्ही त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू.पुढील चार वर्षात आता कोणतीही निवडणूक नाही,त्यामुळे जर आपली चूक झाली तर विकास होईल का ? वाढप्या जरी आपल्या घराचा असला तरी कधी जुळत जर आपण त्याच असेल तर ना,याचा ही विचार करा.
माझ्यात आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यात 2009 पासून ताळमेळ आहे म्हणून आम्हा दोघांचे जमते.आपले नेते मंडळी एकत्र आले आहेत, काही कार्यकर्त्यांमध्ये नाराज आहेत मात्र तुम्हाला लोकांमध्ये या गोष्टी बिंबवाव्या लागतील.मी खात्रीने सांगतो वडापुरी जिल्हा परिषद गटातील तिन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील.आम्ही पण 25 वर्ष राजकारण केलं आहे आम्हाला पण सर्व कळतं, कोण म्हणतो सर्वे असा आहे तसा आहे, डोळ्यात बघितले तरी समोरचा कशासाठी आलाय हे आम्ही सांगू शकतो.
इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकी वेळीही मी सांगितले होते शंभर टक्के भरत शहा निवडून येणार आणि मी पैज जिंकली.प्रमाणिक काम करावे लागते भ्रष्टाचार मुक्त काम करावे लागते तेव्हा लोक पाठीशी उभे राहतात, या निवडणुकीतही आपण एक एक मतासाठी लक्ष देऊ.तालुक्यातील सर्व उमेदवार आपले आहेत त्यामुळे आम्हाला सर्व ठिकाणी जावे लागते.उलट तुम्ही सांगितले पाहिजे आप्पासाहेब तुम्ही इथे काळजी करू नका,आम्ही इकडे बघतो तुझी तिकडे बघा.मी सरळमार्गी माणूस आहे माझा तालुक्यावर विश्वास आहे,माझा तुमच्यावर विश्वास आहे.
इंदापूर नगर परिषदेच्या वेळी कोण म्हणत होते झिरो करू,अरे पण अजित पवार सुप्रिया सुळे दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील ही माणसं झिरो करण्यासारखी नाहीत. त्यांनी इंदापूर तालुक्यासाठी रक्त उतले आहे.आज पवार साहेबांना काय कमी आहे पण ते रक्ताचे पाणी करत आहेत कोणासाठी ? आणि आपण पवार साहेबांचे नाव सांगतो मग आपण त्याच्या पाठीशी राहिले पाहिजे.
आम्ही दिलेले उमेदवार जास्त वयाचे नाहीत,सर्व उमेदवार तरुण आहेत.तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे.उद्याची निवडुक महत्वाची आहे,त्यामुळे तुम्ही आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा विकासाच्या बाबतीत चिंता करू नका. अहो 100 किलो मीटर वर राहणारे आमदार काम करतात आम्ही तर 30 किलोमीटर वर आहोत,त्यामुळे चिंता करण्याचे काहीही कारण नाही.अफवा पसरवण्याचं काम करतील त्याकडे दुर्लक्ष करा असे आवाहन जगदाळे यांनी केले.
What's Your Reaction?