इंदापूर तालुक्यातील लोंढे वस्ती नजीक ट्रक आणि दुचाकीचा अपघात ! अपघातात…

Aug 7, 2024 - 20:57
 0  3159
इंदापूर तालुक्यातील लोंढे वस्ती नजीक ट्रक आणि दुचाकीचा अपघात ! अपघातात…

आय मिरर

पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोंढे वस्ती नजीक भरधाव ट्रकने पाठीमागून दुचाकी स्वाराला धडक दिल्याने भीषण अपघात झालाय. यात दुचाकीवरील महिला जागीच ठार झालीय. सोनाली अविनाश लकडे वय 24 वर्षे असं मृत महिलेचे नांव आहे.

तर मृत महिलेचा पती अविनाश नामदेव लकडे वय 29 वर्षे हा जखमी झाला असून अंदाजे चार वर्षाचा शरवीर अविनाश लखडे हा मुलगा बचावलाआहे. हा अपघात आज बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला आहे.

MH 42 T 2320 या क्रमांकाचा मालवाहू ट्रक पुण्याकडून इंदापूरच्या दिशेने वेगाने निघाला होता. दरम्यान चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने पुढे निघालेल्या दुचाकीला या ट्रकने पाठीमागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की महामार्गावरून दुचाकी स्वाराची दुचाकी ट्रकने जवळपास दहा ते बारा फुट थेट वनीकरणात फरफटत नेली. यात दुचाकी वर असलेली महिला जागीच मृत पावली आहे.

भिगवण नजीकच्या कात्रज ता.करमाळा येथील हे दांपत्य टेंभुर्णीच्या दिशेने निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचा चार वर्षाचा लहान मुलगा देखील होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow