दौंड मधील भांडगावजवळच्या खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कंपनीत वायूगळती,सतरा कामगारांना झाला श्वसनाचा त्रास

Aug 7, 2024 - 21:16
 0  509
दौंड मधील भांडगावजवळच्या खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कंपनीत वायूगळती,सतरा कामगारांना झाला श्वसनाचा त्रास

आय मिरर

खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कंपनीत वायूगळती झाल्याची घटना आज बुधवारी दि.07 आँगस्ट रोजी दौंड तालुक्यातील भांडगांव मध्ये घडली.भांडगांव येथील टेस्टी बाईट इटेबल लिमेटेड कंपनी मधील ही घटना असून सतरा कामगारांना उपचार कामी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सध्या या सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरने सांगितलं आहे.

बुधवारी दि.07 आँगस्ट रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास या कंपनीतून वायु गळती झाली.अमोनिया वायु बाहेर पडल्याने कंपनीत काम करणा-या 15 महिला आणि 2 पुरुष कामगारांना उलटी जुलाबाचा त्रास सुरु झाला.श्वसनास अडचणी येऊ लागल्याने अश्वस्थ वाटु लागले.त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

यातील अलका संभाजी डमरे,वय ३९ वर्षे, सध्या रा. भांडगाव ता. दौंड, सपना सतिश शितोळे, वय ३५ वर्षे, रा. पडवी ता. दौंड आणि दैवशाला मोहन शिंदे, रा. भांडगाव ता. दौंड या ०३ कामगार महिलांना श्वास घेण्यास त्रास वाटु लागल्याने यांना पुढील उपचारकामी विश्वराज हॉस्पीटल, लोणी काळभोर या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.मात्र या तिनही महिलांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉ.सुर्यवंशी यांनी सांगितलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow