घाटकोपरच्या दुर्घटनंतर इंदापूर नगरपरिषदेचा विना परवाना होर्डिंगवर हातोडा
आय मिरर
घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेतून महाराष्ट्र हादरला.भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी राज्य सरकारने देखील आता पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून इंदापूर नगरपरिषदेने सावध भुमिका घेत शासनाचे आदेशान्वये इंदापूर शहरातील धोकादायक असलेले विना परवाना होर्डींग हटवले आहेत.
शहरातील बाबा चौक येथील इमारतेवरील 2 बोर्ड, आय कॉलेज समोरील 2 बोर्ड तसेच तहसील कार्यकाय शेजारील 1बोर्ड असे एकूण 5 होर्डिंगचा यात समावेश आहे.सदरची कारवाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
यासदर मोहिमेत सिटी इंजिनियर शिवदत्त भोसले, CLTC सिव्हिल इंजिनियर प्रसाद देशमुख, अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश सरवदे, आरोग्य विभाग मुकादम दत्तात्रय ढावरे तसेच आरोग्यविभागाचे व वीज विभागाचे सर्व कर्मचारी हे या मोहिमेत सहभागी होते.
What's Your Reaction?