BREAKING उजनीतून भीमा पात्रात 31 हजार 600 क्युसेकने विसर्ग
आय मिरर
उजनी धरणाच्या वरील साखळी मधील सर्व धरणं काठोकाठ भरली असून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. भीमा नदी पात्रात दौंड बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक देखील होतेय. उजनी धरण काटोकाट भरलं असल्यानं उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 31 हजार 600 क्यसेक इतक्या दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.उजनी धरणाचे 16 दरवाजे दोन फुटाने उचलण्यात आलेत.सध्या उजनी धरण 109 टक्के क्षमतेने भरले असून उजनीत 122 टीएमसी इतका पाणी साठा आहे.
भीमा नदी पात्रात दौंड बंधाऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्यास अधिक प्रमाणात विसर्ग केला जाऊ शकतो असं उजनी धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलंय. त्या पार्श्वभूमीवर भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
तर तिकडे वीर धरणाच्या धरण साखळीत ही पावसाचा जोर कायम असल्यानं वीर धरणातून नीरा नदी पात्रात 14 हजार 761 क्युसेक इतका विसर्ग सुरु करण्यात आलाय.
What's Your Reaction?