धक्कादायक ! बहिण भावाच्या नात्याला काळीमा ! अल्पवयीन बहिणीवर चुलत भावाकडूनच अत्याचार
आय मिरर
पुण्याच्या दौंड तालुक्यात बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी दौंड पोलिसांनी दोघाजणांना अटक केली आहे.
लैंगिक संबंधातून ही पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला, यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडित तरुणी दौंड तालुक्यातील रहिवासी असून तिच्यावर वायरलेस फाटा आणि पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे आरोपींनी अनेक वेळा अत्याचार केले आहेत.
यातील आरोपी पैकी एकाचा दौंड तालुक्यात येथे एक फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओत आणि पीडितेच्या घरी आरोपींनी वेळोवेळी पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. 2024 मध्ये मार्च ते जून दरम्यान हा अत्याचार झाल्याचं फिर्यादीत म्हटल आहे. गुन्ह्याचा तपास दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.
What's Your Reaction?