उद्या भरणेवाडीत आ.भरणेंच्या निवासस्थानी होणार नूतन सरपंच सदस्यांची शिरगिणती,भरणे करणार का दूध का दूध आणि पाणी का पाणी ?
आय मिरर
नुकत्याच इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या. यानंतर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दावेगिरी सुरू झाली. निकाल हाती येताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सहा पैकी पाच ग्रामपंचायतीवर आपला दावा ठोकला तर भाजपाने तीन ग्रामपंचायतवर आपला दावा केला.
त्यानंतर शुक्रवारी दि.10 नोव्हेंबर रोजी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे आपल्या भरणेवाडी येथील निवासस्थानी या नूतन सरपंच सदस्यांचा सन्मान सोहळा करीत त्यांची ओळख परेड करणार आहेत. या सोहळ्याला सहा पैकी किती ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच आणि सदस्य उपस्थित राहणार ? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केलेल्या दाव्यानुसार भरणे हे दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार का ? याकडे आत्तापासूनच तालुकावासीयांचं लक्ष लागलं आहे.
सोमवारी दि.०६ नोव्हेंबर रोजी निवडणूकीचे निकाल हाती येताच बावडा, काझड आणि लाकडी या ग्रामपंचायतवर सदस्य आणि सरपंचपदी भाजपाचे उमेदवार विजयी झाले असल्याचा दावा भाजापचे जेष्ट नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.तर वकीलवस्ती ग्रामपंचायत मध्ये स्थनिक आघाडी विजयी झाली असून शेळगाव आणि शिंदेवाडी याठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आली असल्याचं पाटील यांनी म्हटले होते.
तर याला काही तास होतात ना तोच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा दावा खोडून काढला.बावडा वगळता सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आल्याचे कोकाटे यांनी म्हटलं.
तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी थेट पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला.इंदापूर तालुक्यात कोणी काही म्हटलं तरी सहा ग्रामपंचायत पैकी पाच ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आली आहे. मागे जशी ओळख परेड केली होती तशी आम्ही करून दाखवू. असल्या गोंधळात रेटून बोलणे हा कार्यक्रम असतोच असतो. त्या पद्धतीने लोक सांगत असतात असा टोला गारटकर यांनी पाटील यांना लगावला.
राज्यात भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट सरकारमध्ये एकत्रित आहेत.हे तिन्ही पक्ष राज्यात दोस्तीत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र राजकीय कुस्तीच्या आखाड्यात आमने-सामने असल्याचं पाहायला मिळालं.इंदापूर मधील ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुध्द भाजपा हेच चित्र पहायला मिळाले. शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवेळी ही इंदापूरात अशीच ओळख परेड झाली होती.आ. भरणे आणि माजी मंत्री पाटील यांच्या सन्मान सोहळ्याच्या मंचावर तेच ग्रा.पं. सदस्य आणि सरपंच पहायला मिळाले होते,त्यावेळी अजित पवार गट सत्तेत नव्हता.आता उद्या होणाऱ्या या ओळख पराडमध्ये वेगळ काही चित्र पहायला मिळेल का ? की दोघांचा ही हार नवनियुक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आपल्या गळ्यात घालत आम्ही तुमच्याचं सोबत ! म्हणणार हे देखील पहावं लागणार आहे.
What's Your Reaction?