नांदेड,संभाजीनगर, नागपूर मधील घटनेस ट्रीपल इंजिन सरकार जबाबदार - खा.सुप्रिया सुळे

Oct 8, 2023 - 22:12
 0  212
नांदेड,संभाजीनगर, नागपूर मधील घटनेस ट्रीपल इंजिन सरकार जबाबदार - खा.सुप्रिया सुळे

आय मिरर

नांदेड,संभाजीनगर, नागपूर येथे 41 रुग्ण दगावले या घटनेस सर्वस्वी ट्रीपल इंजिन सरकार जबाबदार आहे.यासाठी आरोग्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे.तसेच राज्यातील सर्व रुग्णालयाचे दरवर्षी ऑडिट केले पाहिजे. अशी मागणी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी दि.07 ऑक्टोबर रोजी इंदापूर येथे केले.

इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयास नांदेड घटनेच्या पार्श्वभूमीवर भेट देत रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार वरती टीका केली.यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटर व प्रथम संस्था यांच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, महारुद्र पाटील, सागर मिसाळ, अशोक घोगरे, धरमचंद लोढा, वैद्यकीय अधीक्षक दीपक चोरमले, यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.  

यावेळी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या,मी स्वतः नांदेड ला जाऊन आले ज्या पद्धतीने नांदेडचं मिस मॅनेजमेंट बघितलं. मी दरवर्षी बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व आरोग्य केंद्र यांचा आढावा वर्षातून एकदा घ्यायची , नांदेडची घटना झाल्यानंतर आता दर तीन महिन्यांनी एकदा संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचे हेल्थ ऑडिट करणार आहे.    

नांदेड संभाजीनगर मध्ये ज्या पद्धतीने मुलं दगावले आहेत हा पूर्णपणे सरकारचा हलगर्जी पणा आहे. मला विचाराल तर ही हत्या आहे. डीन आणि डॉक्टर तिथे चांगलं काम करत आहेत.त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी कमी आहेत औषधांचा पुरवठा कमी आहे. तिथे जेनेरिक औषधाच्या दुकान आहे ते भाजपाच्या व्यक्तीला दिलेले आहे तो जास्त दराने औषध विकतो. महाराष्ट्र सरकारच्या ट्रिपल इंजिन सरकारच्या चुकीमुळे झालेली ही घटना आहे.     

त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की संपूर्ण राज्याचे हेल्थ ऑडिट करा त्यासाठी निधीची तरतूद करा. एवढं हलक्यात कोणाचा आयुष्य समजू नका असही खासदार सुळे यांनी सरकारला सुनावले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow