आमदार भरणेंची पुण्यातील 'दिवाळी पहाट रंग' कार्यक्रमास उपस्थिती, बसुबारस निमित्त दिल्या सर्वांना शुभेच्छा

Nov 9, 2023 - 07:35
 0  1077
आमदार भरणेंची पुण्यातील 'दिवाळी पहाट रंग' कार्यक्रमास उपस्थिती, बसुबारस निमित्त दिल्या सर्वांना शुभेच्छा

आय मिरर

पुण्यातील तळजाई टेकडी येथे तळजाई भ्रमण मंडळाकडून "दिवाळी पहाट रंग" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपस्थिती लावत बसुबारस ही साजर केली आहे. दिवाळी पहाट रंग निमित्ताने राजेश दातार यांच्या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

दिपावली सणाची सुरुवात गुरुवार दि.०९ नोव्हेंबर वसुबारस पासून होत असून यानिमित्ताने आ.भरणे यांनी गाईचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले. दिवाळी पहाट निमित्त उपस्थित नागरिकांच्या समवेत दीपोत्सव साजरा करत दिपावली सणाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जेष्ठ नेते उल्हास पवार, मा. नगरसेवक सुभाष जगताप, ढेरे काका आदी मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow