इंदापूर पोलिसांचा नाविन्यपूर्ण उपक्रम,या रणरागिनींच्या हाती सोपवला होता कारभार

आय मिरर
जागतिक महिला दिनी इंदापूर पोलिस ठाण्याच्या कामकाजाची जबाबदारी दिवसभर रणरागिणींनी पार पाडली.एक दिवस इंदापूर पोलिस ठाण त्यांच्या ताब्यात सोपवण्यात आलं होतं,त्यांनी उत्कृष्टपणे कामकाज करून जबाबदारी पार पडल्यानं इंदापूर पोलिस ठाण्याच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी महिलांचा सन्मान होत असताना इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी एक आगळीवेगळी संकल्पना राबवत पोलिस प्रशासनात कार्यरत असलेल्या महिलांच्याच हाती संपूर्ण पोलिस ठाण्याचा कारभार देण्याचा उपक्रम राबवला. या माध्यमातून महिलांचा सन्मान करत त्यांना स्वतःच्या खुर्चीवरही बसण्याची संधी दिली.
यामुळे महिला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये सन्मानाची तसेच आदराची ही भावना वाढीस लागली. यावेळी ठाणे अंमलदार ते ड्यूटी ऑफिसरपासून महिला अंमलदारांनी कार्यभार स्वीकारला.
या उपक्रमामध्ये पोलिस निरीक्षक म्हणून स्मिता पाटील, ठाणे अंमलदार किशोरी बिडवे, आर टीपीसी अश्विनी क्षत्रिय, सीसीटीएनएस ज्योती विभूते, बारनिशी सुरेखा निमगिरे व प्रियांका चौगुले, चालक माधुरी लडकत, मुद्देमाल शुभांगी खंडागळे व अनिषा लव्हे,तर क्राईम अंमलदार म्हणून काजळ शेळके यांनी जबाबदारी पार पाडली.
What's Your Reaction?






