राज्यस्तरीय 'सोमेश्वर टेक्नोथॉन' स्पर्धेत अनंतराव पवार विद्यालयाच्या विज्ञान प्रकल्पास प्रथम पारितोषिक
आय मिरर : भिगवण(नारायण मोरे)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, सोमेश्वरनगर येथे दि -२२ जुलै २०२४ रोजी ' टेक्नोथॉन सोमेश्वर, २के २४ 'या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल चिंचोलीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या 'गवतापासून बनवलेला सेंद्रिय कागद ' या प्रकल्पास ४०० प्रकल्पांमधून प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
हा प्रकल्प पूर्वा देवकाते ,आदिती दुबे ,राजेश्वरी कुताळ व अनुष्का वाघ या विद्यार्थिनींनी विज्ञान शिक्षिका राधिका प्रक्टूर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला.या स्पर्धेतील प्राप्त पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम आठ हजार रुपये ,प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह असे आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सचिव ॲड. नीलिमा गुजर, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, विश्वस्त डॉ.राजीव शहा, श्री मंदार सिकची, रजिस्ट्रार श्री. श्रीष कंबोज व शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता शिंदे यांनी कौतुक केले.
What's Your Reaction?