सर्वांनी मिळून महिलांच्या हाती कारभार सोपवला,त्यांनी राष्ट्रीय पातळीवरचं झेंडा फडकवला ! इंदापूर आयएमएचं मोठं यश

Dec 30, 2023 - 11:32
Dec 30, 2023 - 20:22
 0  254
सर्वांनी मिळून महिलांच्या हाती कारभार सोपवला,त्यांनी राष्ट्रीय पातळीवरचं झेंडा फडकवला ! इंदापूर आयएमएचं मोठं यश

आय मिरर

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या "आवो गाव चले" उपक्रमांतर्गत इंदापूर शाखेने तालुक्यातील पंधारवाडी हे गांव दत्तक घेतले होते. इंदापूर शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्यसेवा व इतर आरोग्यविषयक उपक्रमांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून यावर्षीचा विशेष राष्ट्रीय पुरस्कार इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेला देण्यात आला आहे.

तिरुअनंतपुरम येथे 27 डिसेंबर रोजी पार पडलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार इंदापूर शाखेच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर कल्पना खाडे व सचिव डॉक्टर प्रतिभा वनवे यांना प्रदान करण्यात आला.

आवो गाव चले या उपक्रमांतर्गत इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या वतीने इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी हे गाव दत्तक घेण्यात आले होते. पंधारवाडी गावात इंदापूर शाखेच्या वतीने विविध लोकोपयोगी व आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात आले. यात सर्व रोग निदान शिबिर, कर्करोग तपासणी व उपचार,आरोग्य विषयक जनजागृतीसाठी व्याख्याने, व्यसनमुक्ती कार्यशाळ, नेत्र तपासणी व उपचार यासारख्या विविध उपक्रमांचा समावेश होता. या सर्व कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून त्याची पोचपावती म्हणून राष्ट्रीय परिषदेमध्ये विशेष पुरस्कार देण्यात आला. 

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इंदापूर शाखेचा यावर्षी कारभार प्रथमचं महिलांच्या हाती सोपवण्यात आला आहे.उराशी जिद्द बाळगलेल्या आणि सेवेचे व्रत हाती घेतलेल्या या महिला पदाधिकाऱ्यांना इंदापूर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी उत्तम साथ दिली. सर्वांनी एकत्र येऊन हे अभियान पार पाडलं म्हणूनचं हे यश संपादन करता आले.त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या सर्व पदाधिकारी आणि सहभागी डॉक्टरांवर इंदापूर करांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूरचे मार्गदर्शक डॉक्टर राम अरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व डॉक्टरांनी तन-मन-धन देऊन सहकार्य केल्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे डॉक्टर कल्पना खाडे आणि डॉक्टर प्रतिभा वनवे यांनी सांगितले यासोबतच त्यांनी सर्व डॉक्टरांचे आभार देखील मानले आहेत.

भविष्यात इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या मार्फत पंधारवाडी व इतर गावांमध्येही विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ही डॉक्टर कल्पना खाडे,डाॅक्टर प्रतिभा वनवे यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow