शालेय पोषण आहारात निघाल्या अळ्या ! पालक संतापले
आय मिरर
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील चातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत वितरित करण्यात येत असलेल्या मिलेट्स चॉकलेट मध्ये अळ्या आढळल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
शिक्षण विभागाच्या आदेशाप्रमाणे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून चॉकलेट वितरित केले. 65 पालकांनी शालेय पोषण आहारातील चॉकलेट घरी नेले. त्यापैकी बहुतांश पालकांना चॉकलेट मध्ये पांढऱ्या रंगाच्या अळ्या असल्याचे आढळून आले. त्यामुळे मुख्याध्यापकांना त्या परत आणून दिल्या.
रागी,जवार व बाजरा या तीन प्रकारचे चॉकलेट शाळेला सुट्टी लागल्यानंतर ठेकेदारांनी पोहोचविले. विशेष म्हणजे हा शालेय पोषण आहार जानेवारी आणि फेब्रुवारीचा आहे असे नमूद करण्यात आलेले असताना पुरवठादार कंपनीने पाठवलेल्या चॉकलेटची निर्मिती ही मार्च महिन्यातील दिसत असून जानेवारी आणि फेब्रुवारीचा पोषण आहार म्हणून त्या कशा पाठवण्यात आल्या याबद्दल प्रश्न विचारला जातो आहे.या संदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांना विचारणा केली असता या प्रकरणाची चौकशी चे आदेश दिले असून लवकरच अहवाल प्राप्त होणार असल्याचे सांगितले.
What's Your Reaction?