स्व.रमेश शुक्ल आणि कर्मयोगी भाऊंच्या आठवणींना पद्मा भोसले यांनी दिला उजाळा,म्हणाल्या…

Sep 10, 2023 - 12:38
Sep 10, 2023 - 12:47
 0  1086
स्व.रमेश शुक्ल आणि कर्मयोगी भाऊंच्या आठवणींना पद्मा भोसले यांनी दिला उजाळा,म्हणाल्या…

आय मिरर

कैलासवासी रमेश काका शुक्ल व स्वर्गीय कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांच्या पाश्चात्य पुढील पिढीने देखील तो स्नेह आपुलकीने जपला आहे असे प्रतिपादन शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्मा भोसले यांनी केले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर मधील नामदेव मंदिर कार्यालय कासार पट्टा या ठिकाणी रविवारी दि.१० सप्टेंबर रोजी रमेश चंदुलाल शुक्ल एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन इंदापूर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते आणि शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर च्या अध्यक्षा पद्मा भोसले आणि प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ.एम.के.इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले.यावेळी त्या बोलत होत्या.

पद्मा भोसले म्हणाल्या की, आज औषधोपचार महाग झाले आहेत.गोरगरिबांना अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठी सेवा मिळत असते. त्यामुळे आजचा कार्यक्रम सर्वांच्या दृर्ष्टीने लाख मोलाचा आहे. विशेष म्हणजे आयोजकांनी या कार्यक्रमातून सर्वांपर्यंत सेवा पुरवाव्यात जेणेकरुन कोणीही वंचित राहता कामा नये.या ट्रस्ट आणि अजय ग्रुप ला भविष्यात असेच विधायक काम करण्यासाठी मी शुभेच्छा देते.

राजवर्धन पाटील म्हणाले की, गेल्या आठवड्याभरापासून इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडत आहे. साहेबांचा वाढिदवस हा सामाजिक कार्यातून साजरा होत असल्याने याचा मनस्वी आनंद आहे. कर्मयोगी साखर कारखाना आणि इंदापूर मधील आय काॅलेजवर देखील मोठे रक्तदान शिबीर पार पडले. असेच सामाजिक उपक्रम घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आजच्या आयोजकांचेही मी अभिनंदन करतो.

अँड.राकेश शुक्ल आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हणाले की,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस हा विधायक पध्दतीने साजरा व्हावा या उद्देशाने आणि महागड्या असणा-या आरोग्य तपासणी सुविधा ह्या गोरगरीब जनतेला मोफत मिळाव्यात हाच प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेऊन रमेश चंदुलाल शुक्ल एज्युकेशनल अँण्ड सोशल फाउंडेशन तर्फे हे मोफत तपासणी शिबिर आयोजित केले आहे. 

हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस कोणत्या उपक्रमाने साजरा करावा यासाठी "अजय ग्रुप" कसबा मधील सदस्यांसोबत एकत्रित चर्चा झाली. हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सामाजिक कार्य केलेले आहे.या निमित्त आपण सुद्धा काहीतरी देणे लागतो म्हणून ग्रुपच्या सर्व सदस्यांमध्ये विचार झाला की आपण मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबवूया. बुधराणी हॉस्पिटल पुणे आणि माधवबाग अकलुज शाखेच्या वतीने हे शिबीर राबवण्यात येत आहे. ज्यावेळी २०१९ साली हर्षवर्धन पाटील यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांना पाठींबा दर्शवणारे इंदापूरमधील कसब्यातील "कसबा गणपती" हे गणेश मंडळ पहिले होते याची हि आठवण राकेश शुक्ल यांनी यावेळी करुन दिली.

या कार्यक्रमासाठी भाजपा इंदापूर शहराध्यक्ष शकिल सय्यद, बाजार समितीचे माजी संचालक घनशाम पाटील,हर्षवर्धन पाटील मोटार वाहतुक संस्थेचे चेअरमन रघुनाथ राऊत,माजी उपनगराध्यक्ष रशिदखान पठाण,माजी नगरसेवक कैलास कदम,शेखर पाटील,अर्बन बँकेचे संचालक स्वप्निल सावंत, संचालक दादासाहेब पिसे,जय इंन्स्टिट्युचे संस्थापक अध्यक्ष जयंत नायकुडे,प्रशांत शेटे,सागर गाणबोटे, रोहित पाटील,अजिंक्य जावीर, महादेव व्यवहारे,प्रशांत उंबरे आदी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली "अजय ग्रुप" मधील सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी माजी नगरसेवक कैलास कदम, माधवबागचे डाॅ.अभिजित मगर यांनी मनोगत व्यक्त केले तर सुत्रसंचलन सचिन शुक्ल यांनी केले. कार्यक्रमाचे आभार अमित दुबे यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow