कुंभारगावची वाघीण अखेर जिंकलीच ! आयुक्तांनी अपात्र ठरवलेला आदेश ग्रामविकास मंत्र्यांकडून रद्द

Feb 2, 2024 - 13:12
 0  878
कुंभारगावची वाघीण अखेर जिंकलीच ! आयुक्तांनी अपात्र ठरवलेला आदेश ग्रामविकास मंत्र्यांकडून रद्द

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

इंदापूर तालुक्यातील कुंभारगांव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच श्रीमती उज्वला दत्तात्रय परदेशी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ३९ प्रमाणे सार्वत्रिक निवडणुक २०२१ चे उर्वरित कालावधीसाठी सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरवण्यात आले होते. पुणे विभागिय आयुक्त सौरभ राव यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ०१ जानेवारी २०२४ रोजी हा निर्णय दिला होता. या निर्णयास उज्वला परदेशी यांनी थेट राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या दालनात अपिल केले होते. मंत्री गिरीष महाजन यांनी सर्व दाखल प्रकरणाचा सखोल अभ्यास करुन उज्वला परदेशी यांचे अपिल मान्य करत त्यांना कुंभारगांव च्या सरपंच पदी कायम ठेवण्याचे आदेश गुरुवार दि.०१ फेब्रुवारी २०२४ रोजी दिले आहेत.

अपिलार्थी श्रीमती उज्वला दत्तात्रय परदेशी, सरपंच, ग्रामपंचायत कुंभारगांव, ता. इंदापूर यांचे अपील मान्य करण्यात येत आहे.विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांनी प्रस्तुत प्रकरणी दि.०१ जानेवारी २०२४ रोजी पारित केलेला आदेश रद्द करण्यात येत असल्याचं मंत्री गिरीष महाजन यांनी आपल्याचं आपल्या निकाल पत्रात म्हटले आहे. त्यानुसार इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी कुंभारगावचे ग्रामविकास अधिकारी यांना आदेश बजावला आहे.कुंभारगांव ग्रामपंचायतचे यापूर्वी उपसरपंचाना देणेत आलेले सरपंच पदाचे प्रशासकिय अधिकार श्रीमती उज्वला दत्तात्रय परदेशी यांना पुनश्व पारीत केलेमुळे सरपंच पदाचे अधिकार श्रीमती उज्वला दत्तात्रय परदेशी यांना देणेत येत असल्याचं या आदेशात म्हटले आहे.

सत्य परेशान कर सकता है,पराजित नही…

दमदार आमदार दत्तात्रय भरणे यांची चिकाटी व विचारांचा हा विजय आहे.काही ज्ञात,अज्ञात यांचेही सहकार्य,मार्गदर्शन,आशिर्वाद कामी आले.शेवटी विजय सत्याचाच होतो.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याचे आमदार भरणे यांच्या सहकार्याने गावाचा सर्वांगीण करणार आहे. सत्य परेशान कर सकता है,पराजित नही - सरपंच,सौ.उज्वला परदेशी कुंभारगांव

काय होतं प्रकरण…

ज्ञानराज कुंडलिक धुमाळ आणि गोकुळ किसन येडे, रा. कुंभारगाव ता. इंदापुर जि. पुणे यांनी शाळेच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारा बाबात आयुक्ताकडे तक्रार केली होती.केलेल्या तक्रारीवरून चौकशी समितीच्या अहवाल प्राप्ती वरुन विद्यमान सरपंच उज्वला परदेशी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ३९ प्रमाणे पुढील कालावधी करीता सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरवण्यात आले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow