नीरा-भीमा नदीवरील नवे बॅरेजेस व संरक्षण घाटाची मागणी पूर्णत्वास जाणार - क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे 

Mar 10, 2025 - 19:08
 0  1150
नीरा-भीमा नदीवरील नवे बॅरेजेस व संरक्षण घाटाची मागणी पूर्णत्वास जाणार - क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे 

आय मिरर 

मुंबई, दि.10:- इंदापूर मतदार संघातील निरा व भिमा नदीवर अत्याधु‌निक यंत्रणा, सुसज्ज बॅरेजेसच्या धर्तीवर नवे बॅरेजेस व सुसज्ज संरक्षण घाट बांधण्याची मागणी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. आज मंत्रालयात आयोजित बैठकीत ही मागणी केली असून ही मागणी पूर्णत्वास जाणार आहे.आज ही बैठक मुंबई मंत्रालय येथे झाली.

या मागणीनंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली. नीरा व भीमा नदीवर जास्त पाणीसाठा होणाऱ्या शक्य त्या ठिकाणी बॅरेजेस बांधणीसाठी सर्वेक्षण करण्याची सूचना केली. नदीवर आवश्यकता तपासून घाट बांधण्याबाबत सूचना देत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

अहवाल सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

यावेळी जलसंपदा विभागाचे अपरमुख्य सचिव दिपक कपूर, कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता अजय गुल्हाणे, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके,दत्तात्रय घोगरे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow