इंदापूरात नवजवान मित्र मंडळाने राबवले रक्तदान शिबीर

Sep 26, 2023 - 13:44
Sep 26, 2023 - 13:45
 0  115
इंदापूरात नवजवान मित्र मंडळाने राबवले रक्तदान शिबीर

आय मिरर

रक्ताचा असणारा तुटवडा पाहता सार्वजनिक गणेशोत्सवाचे निमित्त साधून सामाजिक कार्याच्या उद्देशाने ही तूट भरून काढण्यासाठी इंदापूर मधील नवजवान मित्र मंडळ शास्त्री चौक यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात मंडळातील सर्व युवकांनी एकत्रित येवून ५१ रक्त पिशव्या संकलित केल्या.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसाद गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले. हे रक्तदान शिबिर उत्साहात पार पाडण्यात मंडळाचे उत्सव समिती 2023-24 मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल कोतमिरे, उपाध्यक्ष ओम पलंगे, पंकज कोतमिरे,अक्षय कोतमिरे ,अभि कोतमिरे ,शौर्य कोतमिरे ,कृष्णा घोलप, राम घोलप ,रुतुराज पवार, रुषिकेश क्षीरसागर ,शिवम क्षिरसागर, राहुल पलंगे, मनोज पवार, मनोज घोलप ,निलेश घोलप ,नितिन कोतमिरे, विकी पवार ,गणेश कोतमिरे, बापु राहिगुडे, प्रभाकर बिटे, संतोष क्षीरसागर ,कैलास कोतमिरे संंजय कोतमिरे धनंजय पलंगे कोतमिरे सर्व मंडळाचे कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.रक्त संकलन करण्यासाठी मुक्ताई ब्लड बँकेचे अविनाश ननवरे यांचे सहकार्य लाभले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow