मराठा आरक्षणाची धगधगती आग ! इंदापूरच्या सुरवड ग्रामपंचातीच्या ९ सदस्यांचा एकठोक राजीनामा

आय मिरर
मराठा आरक्षणाची धग अधिक वाढत चालली असून राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमिवर इंदापूर तालुक्यातील सुरवड ग्रामपंचायतीच्या नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.सुरवड ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता तुकाराम शिंदे यांकडे या सदस्यांनी आपला राजीनामा दिला आहे.
सौ.गीतांजली संजय कोरटकर, सौ. प्रियंका राहुल म्होपरकर,सौ. सोनाली तात्यासाहेब कोरटकर,सौ. प्रियंका धनाजी वाघ,सौ.पायल बाबासाहेब भोसले,श्री.प्रदीप वसंत कांबळे,श्री. अतुल दत्तात्रय सूळ,श्री. रावसाहेब उत्तम घोगरे आणि श्री.अण्णासाहेब साहेबराव घोगरे या नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळवण्यासाठी आमरण उपोषण सुरु आहे. त्या आंदोलनास पाठींबा म्हणून सर्व ग्रामपंचायत सदस्य आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत. अस त्या सदस्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.
What's Your Reaction?






