आरोपी ताब्यात देत नाहीत म्हणून जमावाने पोलिसांवर हल्ला केला, न्यायालयाने त्यांची रवानगी थेट कारागृहात केली

Jun 26, 2024 - 07:07
Jun 26, 2024 - 07:10
 0  304
आरोपी ताब्यात देत नाहीत म्हणून जमावाने पोलिसांवर हल्ला केला, न्यायालयाने त्यांची रवानगी थेट कारागृहात केली

आय मिरर 

जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथे एका सहा वर्षीय बालिकेवर चॉकलेटचे अमिश दाखवून अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपी सुभाष ये माझी भिल्ल याला अटक झाल्यानंतर जमावाने ताब्यात द्यावे अशी मागणी केली होती, मात्र पोलिसांनी आरोपी ताब्यात देता येणार नाही असे सांगितल्यानंतर जमावाने पोलिसांवर हल्ला केला होता. 

या हल्ल्यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणात पोलिसांनी 21 जणांना अटक केली होती.

सदर या आरोपींना दिनांक 25 रोजी न्यायालयात हजर केले असता जामनेर न्यायालयाने त्यांची रवानगी धुळे कारागृहात केली आहे.या सर्व आरोपींना पोलिसांनी बंदोबस्तामध्ये जामनेर शहरातून पायी कोर्टात नेले व त्यानंतर त्यांची रवानगी धुळे कारागृहात करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow