बिग ब्रेकिंग | पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात कंटेनरच्या चाकाखाली सापडून महिला जागीच ठार

Jun 26, 2024 - 06:58
 0  175
बिग ब्रेकिंग | पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात कंटेनरच्या चाकाखाली सापडून महिला जागीच ठार

आय मिरर

पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या सहाव्या वळणावर भैरवनाथ मंदिराजवळ कंटेनरला धडकून मागच्या चाकाखाली आलेल्या सुलतानपूर (ता. वाई) येथील नंदिनी राजेंद्र कळंगुडे या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज सायंकाळी सहा वाजता घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की आज सायंकाळी कंटेनर जात असताना विरुद्ध बाजूने दुचाकी वाहन घेऊन दोघे निघाले होते. यावेळी गाडी मागे बसलेली महिला नंदिनी यांचा तोल जाऊन, त्या कंटेनरच्या मागच्या चाकाखाली आल्यामुळं या महिलेचा जागी मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी महामार्ग पोलीस व खंडाळा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतचा अधिक तपासही पोलिस करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow