बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा गोळीबारात मृत्यू
आय मिरर
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला केला आहे. त्याला ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जात असतानाही घटना घाडली. यावेळी अक्षयने पोलीसांजवळील बंदूक हिसकावरून पोलिसांच्या गाडीवर गोळीबार केला.
यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे जखमी झाला, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे.
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे हा आरोपी होता. त्याने दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केलं. १२ आणि १३ ऑगस्टला ही घटना घडली. त्यानंतर २० ऑगस्टला या प्रकरणाच्या विरोधात बदलापूरमध्ये मोठा बंद पाहण्यास मिळाला. बदलापूर बंदमध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. बदलापूरकरांनी ९ तास रेल्वे रोकोही केला होता. या घटनेनंतर अक्षय शिंदेला फाशी द्या ही मागणीही जोर धरु लागली होती. आता अक्षय शिंदेचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
तळोजा तुरुंगातून अक्षय शिंदेला आणलं जात होतं. तेव्हा एपीआय मोरे यांची बंदुक अक्षय शिंदेने खेचली आणि गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातात लोडेड बंदुक होती त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला. त्यावेळी अक्षय शिंदेला गोळ्या लागल्या. अक्षय शिंदे ला आणि जखमी पोलिसांना रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र तोपर्यंत अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. ही माहिती आता समोर आली आहे. पीटीआयने या बाबतचं वृत्त दिलं आहे
What's Your Reaction?