भाजपाचे आ.राहुल कुलांच्या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा ? वाचा सविस्तर
आय मिरर
दौंड चे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे.दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.
वीरधवल जगदाळे यांच्या मागणीनंतर दौंडच्या जागेवरून महायुती मध्ये वाद होण्याची शक्यता आहे.बारामती लोकसभेला सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवावी याची पहिली मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली होती आणि ती मागणी मान्य देखील झाली होती.
त्यानंतर जगदाळे यांनी आता दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी केल्याने दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी पक्षाकडे गेल्यास आमदार राहुल कुल यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?