शंकरराव गायकवाड यांचे निधन, भिगवण परिसरावर शोककळा

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील सामाजिक कार्यकर्ते व गावचे माजी उपसरपंच शंकरराव लक्ष्मण गायकवाड( वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस ते एका आजाराने त्रस्त होते सोमवार ( ता.५) रोजी भिगवण येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात संपूर्ण भिगवण आणि परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला.
शंकरराव गायकवाड हे आण्णा या नावाने परिचित होते. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी भिगवण परिसरातील जनतेचे मने जिंकली होती. पंचवीस वर्षांपूर्वी भिगवण येथे मयूर पतसंस्थेच्या स्थापनेत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्या पतसंस्थेचे अनेक वर्ष त्यांनी चेअरमनपद भुषविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित होते राष्ट्रवादी पक्षाने त्यांना इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे बिनविरोध संचालकपद बहाल केले होते. भिगवण येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे ते ज्येष्ठ मार्गदर्शक होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. भिगवणच्या माजी सरपंच हेमाताई माडगे या त्यांच्या भगिनी होत.
What's Your Reaction?






