जग कितीही बदललं तरीही 'तो' नाही बदलला, घुंगरुतील बाबा गायकवाडांना आला अनुभव,शिंदेचं केलं कौतुक
आय मिरर
जग कितीही बदलले असले तरी या जगात आजही प्रामाणिकपणा शिल्लक आहे याचा अनुभव इंदापूरात घडलेल्या एका प्रसंगातून घुंगरु सिनेमातील अभिनेते बाबा गायकवाड यांना नुकताच आला.
इंदापूर मध्ये मंगळवारी दि.१७ आँक्टोंबर रोजी तेजपृथ्वी ग्रुप कडून नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने उल्लेखनीय काम करणा-या महिलांचा सन्मान सोहळा इंदापूर पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी माळी महासंघाचे अध्यक्ष विकास शिंदे यांच्या एका खुर्चीवर कोणीतरी आपला मोबाईल विसरुन गेले आहेत लक्षात आहे.
शिंदे यांनी तात्काळ तो ताब्यात घेत मोबाईल मालकाला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी थेट मंचावरती जावून याबाबत लाउड स्पीकर वर याची माहिती दिली. मात्र कोणीही पुढे आले नाही.
शिंदे यांनी नानासाहेब खरात यांच्या कानी ही गोष्ट घातली.दुसऱ्या दिवशी नानासाहेब खरात यांनी चौकशी केली असता तो मोबाईल कार्यक्रमासाठी उपस्थिती असणारे घुंगरु चित्रपटात काम करणारे अभिनेते बाबा गायकवाड यांचा तो मोबाइल असल्याचं निष्पन्न झाले.शिंदे यांनी प्रामाणिक पणे हा हजारो रुपये किमतीचा महागडा इमाणदारीने परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
गायकवाड हे कार्यक्रम आटोपून घाईगडबडीने निघाले होते. त्यात त्यांचा मोबाईल कार्यक्रम स्थळी खुर्चीवर विसरला होता.हे गायकवाड यांच्याही उशीरा लक्षात आले.खरात यांनी शिंदे व गायकवाड यांचा संपर्क करुन देत गायकवाड यांना तो मोबाईल परत केला.गायकवाड यांनी शिंदे यांचे आभार मानत शिंदे यांच्या प्रामाणिकतेचे कौतुक केले.
तर तेज पृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष अनिता खरात आणि नानासाहेब खरात यांनीही शिंदे यांचे कौतुक केले.
What's Your Reaction?