आठ एकरातील कपाशीवर फिरविले रोटाव्हेटर,अंजनगाव सुर्जी येथील शेतकऱ्याने उचललं टोकाच पाऊल

आय मिरर
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणाऱ्या खेल कृष्णाजी येथे राहणाऱ्या शेतकऱ्याने आठ एकरातील कपाशीवर रोटावेटर फिरवला आहे.त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्याने केलेला एक लाखांचा खर्च वाया गेला आहे.या पिकातून उत्पादन होणार नसल्याने लक्षात घेत शेतकऱ्यांना हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
शेतकरी साबीर मो.सिद्दिक, मो.सादिक मोहम्मद मुजाहिद यांनी तब्बल आठ एकर शेतीतील कपाशी व आंतरपीक म्हणून तुरीवर रोटावेटर फिरवला आहे.पिकापेक्षा वाढलेले गवत, पाने व फुले गळतीने पिकातून उत्पादन होणार नव्हते.त्यामुळे कंटाळून शेतकऱ्यांन शेतातील संपूर्ण पीकच नष्ट केले.प्रशासनाने नुकसानग्रस्त कपाशी पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.
What's Your Reaction?






