मागासवर्गीय समाजातील युवक उद्योजक बनावेत यासाठीच दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना - सीमा कांबळे
मागासवर्गीय समाजातील युवकांनी उद्योजक बनले पाहिजे या मुख्य उद्देशानेच दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती सीमा कांबळे यांनी दिली.
इंदापूर येथील विश्रामगृहात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व श्रीजा एंटरप्राईजस् यांच्या संयुक्त विद्यमाने 'विक्रेता विकास संवादात्मक' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सीमा कांबळे, पश्चिम भारताचे अध्यक्ष अविनाश जगताप, राज्याध्यक्ष मुकुंद कमलाकर, सल्लागार निवेदिता कांबळे, कमिटी सदस्य सचिन दिघोळकर, साताऱ्याचे उद्योजक प्रसन्न भिसे, एन.एस.आय.सीचे प्रमुख रितेश रंगारी, सोलापूर रेल्वे विभागाचे सहायक व्यवस्थापक रमेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
सीमा कांबळे म्हणाल्या,सन २००५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने कमिटी नियुक्त केली होती. कमिटीत बारा कॅबिनेट मंत्री, सहा नामवंत तज्ज्ञ त्यामध्ये माजी कुलगुरू नरेंद्र जाधव, भंते राहुल बोधी, पद्मश्री डॉ.मिलिंद कांबळे यांच्यासह पंजाब, कन्नड भाषेतील साहित्यिक आदींचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून स्टार्ट अप इंडिया नावाने योजना आणली. स्टार्ट अप इंडिया ही योजना डीक्किची योजना असून डॉ.मिलिंद कांबळे यांनी कार्यान्वित केलेली योजना आहे असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त एखादं टपालचे तिकिट किंवा एखादं नाणं प्रकाशित केले जाते.परंतु,ज्याच्या डोक्यामध्ये समाजाचा विकासाचा विचार असतो, तो माणूस समाजाला विकसित करण्यासाठी योजना आणतो. देशातील सव्वा लाख बँकांमध्ये ही योजना लागू करण्यात आली. या बँकांमधून एका एस,एसटी समाजातील युवकांना उघोगासाठी पतपुरवठा केला तर सव्वा लाख नवीन उद्योजक तयार होतील. या पध्दतीने स्टार्ट अप इंडिया ही योजना सुरू झाली.
एन.एस.आय.सीचे प्रमुख रितेश रंगारी यांनी शासनाच्या विविध योजनांचे अनुदान, सवलती या बाबींची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन भरत भगत यांनी केले. आभार संदीपान कडवळे यांनी मानले. श्रीजा एंटरप्राईजस् चे शंकर घाडगे यांनी स्वागत केले. विनय सुर्यवंशी,सुमित चव्हाण,अक्षय दगडे, सचिन घाडगे, स्वप्निल शेंडे,गुलाबा अवघडे,सागर घाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
What's Your Reaction?