इंदापुरात कृष्णा हॉस्पिटल मधील गुडघा व खुबा सांधेरोपण शस्त्रक्रिया शिबिरात 160 रुग्णांची मोफत तपासणी

आय मिरर
इंदापूर मधील कृष्णा हॉस्पिटल मध्ये गुडघा व खुबा सांधे रोपण शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. रविवारी दि.23 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या शिबिरात 160 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली व त्यांना आरोग्य विषयक सल्ला देण्यात आला. तर 40 रुग्णांची सवालतीच्या दरात व शासकीय योजनेतून कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी या शिबिरात नाव नोंदणी झाल्याची माहिती कृष्णा हॉस्पिटलचे डॉक्टर अतुल वनवे यांनी दिली.
या शिबिरासाठी पुणे येथील विश्वराज हॉस्पिटलचे कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.रामप्रसाद धरणगुट्टी यांचं इंदापूर मधील डॉ. अविनाश पानबुडे आणि डॉ.अनिल शिर्के यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर प्रतिभा वणवे देखील उपस्थित होत्या.
अधिक माहितीसाठी रुग्णांनी 7073565050 या क्रमांकावर ती संपर्क साधण्याच आवाहन डॉ. वनवे यांनी केल आहे.
या शिबिरात प्रामुख्याने सततची गुडघे दुखी,जिना चढण्यास, उतरण्यास त्रास होणे,खुबा दुखणे किंवा निखळणे, गुडघा दुखी व त्यावरील सूज या आजारांवर तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
What's Your Reaction?






