महसूलमंत्री विखे पाटलांचा आमदार भरणेंना 'ग्रीन' सिग्नल,खंडकरी शेतकरी व कामगारांचा प्रश्न लवकरच लागणार मार्गी       

Oct 4, 2023 - 20:51
Oct 4, 2023 - 20:52
 0  559
महसूलमंत्री विखे पाटलांचा आमदार भरणेंना 'ग्रीन' सिग्नल,खंडकरी शेतकरी व कामगारांचा प्रश्न लवकरच लागणार मार्गी       

आय मिरर

इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी नुकत्याच झालेळ्या अधिवेशनात इंदापूर तालुक्यातील खंडकरी शेतकरी बांधवांचा प्रलंबित असणारा प्रश्न उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले होते. यावर आता मंत्रालयात मंगळवारी दि.3 ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे.

भरणे यांच्या मागणीनुसार खंडकरी शेतकरी बांधवांचा खंडकरी शेतकरी बांधवांच्या भोगवटा वर्ग २ जमिनीचे भोगवटा वर्ग १ मध्ये विनाशुल्क रूपांतर करण्यासाठी सादर झालेल्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडून तातडीने मान्यता देणार असून एक एकर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रश्न आता १० गुंठे पासून ते १ एकरापर्यंत त्यांना जमिन देऊन कायमचा निकाली काढणार असल्याचा ग्रीन सिग्नल विखेंनी भरणेंना दिलाय.

कळंब ,रणगांव, वालचंदनगर, आनंदनगर,जंक्शनसह दहा ते बारा गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या जल जीवन मिशन योजना,शाळा इमारती,आरोग्य व शासकीय कार्यालये, घरकुले,मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमीसाठी लागणारी जागा,गावठाण विस्तार वाढीसाठी लागणारी जमीन यासह इतर बाबींसाठी शेती महामंडळाची जागा मिळण्याबाबत मागणी केली असता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदर मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून त्यास मंजुरी घेऊन शासनाच्या पुढील धोरणात्मक निर्णयांसाठी विशेष अध्यादेश काढणार असल्याचं ही आमदार भरणे यांनी माध्यमांना सांगितले आहे.

शेती महामंडळाच्या कामगारांच्या हक्कांच्या घरांसाठी मिळणार जागा…

त्याचबरोबर शेती महामंडळाच्या कामगारांच्या हक्कांच्या घरांच्या जागेसाठी महिनाभरात मंत्रालयात लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी यांची संयुक्त स्वतंत्र बैठक घेऊन कामगारांना 2 गुंठे तसेच घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना जागा देणेबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही ही विखे पाटलांनी दिल्याची माहिती भरणे यांनी दिली.

या बैठकीस विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे,फलटणचे आमदार दिपक चव्हाण, राज्याचे अप्पर मुख्य सचिव राज गोपाल देवरा, राज्याचे वित्त व नियोजन सचिव विश्वजित माने,शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माने साहेब, रत्नपुरी मळ्याचे तहसिलदार लंगोटे साहेब, खंडकरी प्रतिनिधी सुहास डोंबाळे पाटील, कामगार नेते युवराज रणवरे,अतुल सावंत,राहुल रणमोडे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow